AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Election Result 2023 | पैकीच्या पैकी, जळगावच्या जामनेरमध्ये कुणाची बाजी? धक्कादायक आकडेवारी समोर

Jalgaon Gram Panchayat Election Result 2023 | राज्यभरातील 2359 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीला अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली. अखेर निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी आज समोर येतेय. जळगावातील बडे नेते एकनाथ खडसे यांना जामनेरमध्ये चांगलाच धक्का लागल्याचं बघायला मिळत आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत चांगली बातमी समोर आली आहे.

Jalgaon Election Result 2023 | पैकीच्या पैकी, जळगावच्या जामनेरमध्ये कुणाची बाजी? धक्कादायक आकडेवारी समोर
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 3:59 PM

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, जळगाव | 6 नोव्हेंबर 2023 : जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांची मान अभिमानाने उंचावेल, अशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी समोर आली आहे. जळगाव जिल्हा म्हटला की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचं नाव चर्चेत येतं. कारण खडसे यांचा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यात येतो. खडसे यांची राजकारणाची सुरुवात जळगाव जिल्ह्यापासून झाली. खडसेंनी उत्तर महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवला. तसेच पक्षाने देखील खडसेंना अनेकदा संधीदेखील दिली. खडसेंना अनेक पदं मिळाली. पण गेल्या काही वर्षांपासून खडसे भाजपमध्ये अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून खडसेंचे एकेकाळचे सहकारी असलेले नेते मंत्री गिरीश महाजन आणि खडसे यांच्या सातत्याने वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात प्रत्येक निवडणुकीत चुरशीची लढत बघायला मिळते. ग्रामपंचायत निवडणुकीतही ते बघायला मिळतं. या निवडणुकीत खडसे यांच्या गटाला किती यश मिळतं? याकडे राज्याचं लक्ष होतं. अखेर निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. जामनेर तालुक्यातील निवडणुकीचा निकाल तर अतिशय धक्कादायक आलाय. तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमध्ये एकनाथ खडसे यांच्या गटाला एकाही ठिकाणी यश आलेलं नाही. हा खडसेंच्या गटाला मोठा धक्का मानला जातोय. तर गिरीश महाजन यांना मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे.

खडसेंनी विशेष लक्ष दिलं, तरीही पराभव

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत एकतर्फी यश आलंय. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जामनेरमध्ये भाजपला 17 पैकी 17 ग्रामपंचायतींमध्ये निर्विवाद यश मिळालं आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंनी जामनेर मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं होतं. पण तरीही खडसेंच्या गटाला इथे यश मिळालेलं नाही.

गिरीश महाजन म्हणाले…

निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “सर्व ठिकाणी भाजपच्या जागा निवडून आल्या आहेत. 17 च्या 17 सरपंच हे भाजपचे निवडून आलेले आहेत. या जिल्ह्यात 167 जागी निवडणूका होत्या. त्यातील 100 च्या जवळपास जागा भाजपने जिंकल्या आहेत. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. प्रेम आणि विकासकाम यामुळे हा कल जनतेने दिला आहे”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.