वैशूताई, तात्यासाहेबांचं एक स्वप्न तू पूर्ण कर, पण एक स्वप्न मी.. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर पाचोऱ्यात बहीण-भावातला संघर्ष पेटला

शिवसेनेतील  बंडामुळे पाचोऱ्यात पाटील कुटुंबातच कलह निर्माण झाला आहे. आर ओ तात्यांच्या कन्या आणि शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

वैशूताई, तात्यासाहेबांचं एक स्वप्न तू पूर्ण कर, पण एक स्वप्न मी.. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर पाचोऱ्यात बहीण-भावातला संघर्ष पेटला
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 3:41 PM

अनिल केऱ्हाळे, जळगाव : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जळगावातील पाचोऱ्यात दणदणीत सभा झाली. शिवसेना नेते स्व. आर ओ तात्या यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा उद्धव ठाकरे यांच्या हस्त पार पडला. उद्धव ठाकरे यांनी पाचोऱ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप तसेच एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. तर पाचोऱ्यात वैशाली पाटील सूर्यवंशी या ठाकरे गटाच्या आगामी विधानसभा उमेदवार असतील असे सूतोवाचदेखील केले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी आज येथील शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी आर ओ तात्यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.

शिवसेनेतील  बंडामुळे पाचोऱ्यात पाटील कुटुंबातच कलह निर्माण झाला आहे. आर ओ तात्यांच्या कन्या आणि शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ठाकरे गटाकडून वैशाली पाटील यांना राजकीय बळ मिळालं असून गेल्याकाही दिवसांपासून त्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर सभेतून वैशाली पाटील यांना उघड प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी बहीण वैशाली पाटील यांना मोलाचा सल्ला दिलाय.

बहिणीला किशोर पाटील यांचा सल्ला काय?

शिवसेनेचे माजी आमदार आणि आपले काका स्व. आर. ओ. पाटील यांनी आपल्याला त्यांचे राजकीय वारसदार म्हणून घोषित केले होते. त्यामुळे त्यांची स्वप्ने आपण पूर्ण करीत आहोत. मात्र आर. ओ. पाटील यांची कन्या व आमची बहीण वैशाली सूर्यवंशी पाटील यांच्या माध्यमातून वडिलांनी सुरू केलेला उद्योग व्यवसाय जगाच्या पाठीवर नेऊन भरभराटीला नेण्याचं स्वप्न बघितलं होतं. ते त्यांनी पूर्ण करावं असा मोलाचा सल्ला शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी बहिणीला दिलाय. विशेष म्हणजे कालच उद्धव ठाकरे यांनी वैशाली सूर्यवंशी यांच्या उमेदवारीचे संकेत सभेत झालेल्या जाहीर भाषणातून दिले आहेत.

पुतळ्याला दुग्धाभिषेक..

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी आपले काका माजी आमदार आर. ओ. तात्या त्यांच्या पुतळ्याचे दिवस पूजन करत अभिवादन केलं. काल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरोप पाटील यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचा अनावरण करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आमदार किशोर पाटील यांना निमंत्रण नव्हतं. आमदार किशोर पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन आरोपांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आणि त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्प अर्पण केली.

‘कुटुंबांत फूट पाडण्याचं पाप’

उद्धव ठाकरे हे कुटुंबांमध्ये फूट पाडण्याचं पाप करतायत, असा गंभीर आरोप आमदार किशोर पाटील यांनी केला. कुटुंबात वाद निर्माण करण्याची सुरुवात मातोश्रीने केली आहे. त्यांना खरच आमच्या कुटुंबाचा कळवळा असता तर त्यांनी वैशूताईंना जिथे आहे तिथे सुखी रहा, असा सल्ला दिला असता. तिने २५ वर्ष राजकारणाशी संबंध नसताना अचानक कसा शिवसैनिक जागृत झाला? वैशूताई कधीही माझी आमदारकी किंवा बायकोच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत फिरली नाही. कधी तात्यासाहेबांच्या प्रचारात फिरली नाही. आता अचानक कशी सक्रिय झाली, हा संशोधनाचा विषय आहे, असं वक्तव्य किशोर पाटील यांनी केलंय. तर दीघे साहेबांनी एकनाथ शिंदे यांना वारसदार घोषित केलं असताना त्यांच्या पुतण्याला घेऊन उद्धव ठाकरेंनी कुटुंबात फोड केली, असा आरोप किशोर पाटील यांनी केला. तसाच प्रकार पाचोऱ्यात आमच्या कुटुंबात केल्याचं वक्तव्य किशोर पाटील यांनी केलंय.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.