Karnataka Election 2023 : “बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना” ;कर्नाटकच्या निकालानंतर भाजपच्या नेत्याने संजय राऊतांवर केली सडकून टीका
गिरीश महाजन यांनी टीका करताना त्यांना म्हणाले की, दुसऱ्याला मुलगा झाला म्हणून संजय राऊत पेढे वाटतात मात्र स्वतः ते वांझोटे असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
जळगाव : दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे राज्य कर्नाटकात आज काँग्रेसकडून दारुण पराभव झाला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेसमध्ये जल्लोष साजरा करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच राज्यात महाविकास आघाडी असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या विजयावर ठाकरे गटाकडून भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला जात आहे. खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या पराभवावर बोट ठेवत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांकडून आणि मंत्र्यांकडून संजय राऊत यांना लक्ष्य केले जात आहे.
कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, आम्ही निवडणूक हरलो म्हणून संजय राऊत तोंड सुख घेत आहेत.
बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे आता राज्यात कर्नाटक निवडणुकीवरून जोरदार युद्ध रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
गिरीश महाजन यांनी टीका करताना त्यांना म्हणाले की, दुसऱ्याला मुलगा झाला म्हणून संजय राऊत पेढे वाटतात मात्र स्वतः ते वांझोटे असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
बजरंग बलीच्या गद्यावरून संजय राऊत यांनी त्यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे त्यावरूनही त्यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. त्यामुळे संजय राऊत आणि आमच्या गदा यापेक्षा त्यांनी त्यांच्या धनुष्यबाणाकडे बघावं असा सल्लाही मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना दिला आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण, आमदार, खासदार यापैकी आता त्यांच्याकडे कोणीच राहिले नाही म्हणून तुमचं काय आधी ते दाखवावं असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
कर्नाटक राज्याचा आज निकाल लागला असला तरी आणि भाजपचा पराभव झाला असला तरी ठाकरे गटाने आधी आपलं आत्मपरीक्षण करावं, त्यानंतर त्यांनी भाजपवर बोलावं असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
त्यांनी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवरून आमच्या टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट कुठे आहे हे आधी संजय राऊत आणि ठाकरे गटाने बघावे असा टोलाही गिरीश महाजन यांनी त्यांना लगावला आहे.