Raj Thackarey : जळगाव न्यायालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर चौघांची निर्दोष मुक्तता
या गुन्ह्यात पोलिसांनी 13 जानेवारी 2009 रोजी प्रथम वर्ग न्यायंदडाधिकारी यांचे न्यायालयात सर्व आरोपींविरूध्द दोषारोपपत्र तयार करण्यात आले. या खटल्यात राज ठाकरेंसह सर्व आरोपींना समन्सची बजावण्यात आले होते. त्यानंतर राज ठाकरेंसह इतर आरोपींना न्यायाल्याने जामीनावर मुक्त केले होते. या खटल्यात राज ठाकरे यांना वैयक्तिक हजेरीपासून माफी देण्यात आली होती.
जळगाव : मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी यासाठी केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरे (Raj Thackarey) यांना अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद जळगावात उमटले होते. याप्रकरणी 21 ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरेंसह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत राज ठाकरे यांना न्यायालया (Court)ने वॉरंट देखील बजावला होता. त्यानंतर पंधरा हजारांचा जामीन मंजूर करून या खटल्यात गैरहजर राहण्याची परवानगी न्यायालयाने राज ठाकरे यांना दिली होती. या सुनावणीअंती आज जळगाव न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह तत्कालीन प्रदेश सरचिटणीस अॅड.प्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, पदाधिकारी रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांची निर्दोष मुक्तता केली आहे. (MNS president Raj Thackeray and four others acquitted in Jalgaon court)
गोलाणी मार्केटमधील आंदोलन प्रकरणी सुरु होता खटला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे रेल्वेत मराठी माणसांची भरती करण्यात यावी. यासाठी केलेल्या आंदोलन केल्यामुळे त्यांना 21 ऑक्टोबर 2008 रोजी अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी जळगाव येथे मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेत्वृत्वाखाली अॅड.जमील देशपांडे, प्रेमानंद जाधव, रज्जाक यासीन यांनी गोलाणी मार्केट परिसरात डिजीटल बॅनरवर “फाशी द्या लालूला आधी जोडे मारा साल्याला” असे लिहून घोषणाबाजी केली होती. त्यावेळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सदरचे आंदोलन दिसले. तसेच आंदोलन करणाऱ्यांनीही पोलिसांना पाहिल्यावर पळापळ सुरु केली. यावेळी वाहनांचे नुकसान झाले म्हणून शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्टेबल श्यामकान्त पाटील यांनी राज ठाकरे यांच्यासह इतरांविरूध्द 21 ऑक्टोबर 2008 रोजी कलम 143, 147, 427, 109, मुंबई पोलिस अॅक्टचे कलम 135 तसेच महाराष्ट्र डॅमेज अॅक्टचे कलम 03 व 07 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सर्व आरोपींना जामिनावर सोडण्यात आले होते
या गुन्ह्यात पोलिसांनी 13 जानेवारी 2009 रोजी प्रथम वर्ग न्यायंदडाधिकारी यांचे न्यायालयात सर्व आरोपींविरूध्द दोषारोपपत्र तयार करण्यात आले. या खटल्यात राज ठाकरेंसह सर्व आरोपींना समन्सची बजावण्यात आले होते. त्यानंतर राज ठाकरेंसह इतर आरोपींना न्यायाल्याने जामीनावर मुक्त केले होते. या खटल्यात राज ठाकरे यांना वैयक्तिक हजेरीपासून माफी देण्यात आली होती. त्यानंतर या खटल्याचे कामकाज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. जोशी साहेब यांच्यासमोर 25 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाले.
या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादीसह व इतर पोलिस कॉन्टेबल पंच व वाहनांचे नुकसान झालेले नागरिक यांची साक्ष घेण्यात आल्या. एकंदरीत न्यायालयासमोर आलेला पुरावा पाहता व खटल्यातील आरोपी पक्षाकडून केलेला युक्तीवाद लक्षात घेता आज प्रथम वर्ग न्यायंदडधिकारी यांनी राज ठाकरे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, अॅड जमील देशंपाडे, प्रेमानंद जाधव, यासीन रज्जाक यांची निर्दोष मुक्तता केली. (MNS president Raj Thackeray and four others acquitted in Jalgaon court)
इतर बातम्या
Video | बसची कारला धडक, कालचालक महिलेनं बसचालकाच्या थोबाडीत लगावली कडक! चूक कुणाची?
Yogi Government : सीएए आंदोलकांकडून दंड वसुली थांबवा; योगी सरकारला सुप्रीम कोर्टाने झापले