दागिन्यांसाठी त्या महिलेची शेजाऱ्यानीच केली हत्या; पूर्णा नदीत फेकला मृतदेह; पोलिसांनी दोनच दिवसात लावला छडा
मलकापूर शहरातील एक महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या महिलेचा मुलला रितेश माधवराव फाळकेला मृत महिलेचा फोटो आणि वस्तू दाखवल्यानंतर रितशने ही आपलीच आई असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने आपल्या आईचे नाव प्रभा माधवराव फाळके असल्याचेही पोलिसांना सांगितल्यानंतर महिलेची ओळख पटली.
मुक्ताईनगरः जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील घोडसगाव पुलाच्या खाली पूर्णा नदीच्या पात्रात आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. या महिलेची अंगावरील दागिन्यांसाठी हत्या (Murder) झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. केवळ 50 तासात आरोपींना बेड्या ठोकल्याने मुक्ताईनगर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. 29 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील घोडसगाव पुलाखाली पूर्णा नदीच्या पात्राच्या काठावरच 30 ते 35 वयाच्या महिलेचे मृतदेह एका जाड प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरून टाकल्याचे आढळून आले होते. नदी पात्रावर असलेला मृतदेह ज्या पिशवीत भरून टाकलेला होता, त्यावर अकोल्यातील एका कंपनीचे नाव होते. त्या कंपनीच्या नावावरून मुक्ताईनगर पोलिसांनी आपला तपासाची चक्रे विदर्भाकडे वळवण्यात आली.
मुलाने आईला ओळखले
मलकापूर शहरातील एक महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या महिलेचा मुलला रितेश माधवराव फाळकेला मृत महिलेचा फोटो आणि वस्तू दाखवल्यानंतर रितशने ही आपलीच आई असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने आपल्या आईचे नाव प्रभा माधवराव फाळके असल्याचेही पोलिसांना सांगितल्यानंतर महिलेची ओळख पटली.
शेजाऱ्यांनीच केला घात
मृत महिलेचे आपल्या कुटुंबीयांमध्ये वाद होत असल्याने ही महिला शेजारी असलेले भार्गव विश्वास गाडे आणि विश्वास भास्करराव गाडे यांच्याकडे नेहमी येणे जाणे होते. या महिलेच्या अंगावरही दागिने होते, ते घेण्यासाठी गाडी पिता-पुत्रा यांनी महिलेच्या डोक्यात रॉड मारुन हत्या केली. त्यानंतर मृतदेह पूर्ण नदीच्या पात्राच्या काठावर घोडसगाव पूलाखाली आणून टाकला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर भार्गव गाडे याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांनी दिली.
मोबाईल लोकेशनवरुन तपास
महिलेची ओळख पटवणे आणि आरोपी निष्पन्न करण्यासाठी पोलिसांनी मोबाईल लोकेशन, सीडीआर रिपोर्ट आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रभा शेळके ही महिला भार्गव विश्वास गाढे आणि विश्वास भास्करराव गाढे यांच्यासोबत गेल्यानंतरच बेपत्ता झाल्याचे निष्पन्न झाले होते, त्यानंतर सरळ तिचा मृतदेह आढळून आला होता.
तपास पथकातील अधिकारी
तपास पथकात पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल बोरकर, गणेश मनुरे, संतोष नागरे ,धर्मेंद्र ठाकूर, नितीन चौधरी, देवसिंग तायडे, कांतीलाल केदारे, मंगल पारधी, राहुल बेहनवाल, रवी धनगर ,मुकेश घुगे यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभाग जळगाव आणि मलकापूर पोलिसांच्या पथकाने सहाय्य केले आहे.