AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लाडक्या बहिणीच्या विरुद्ध लाडकी बायको…’, कराळे गुरुजींचा अजित पवारांवर खोचक शब्दांत निशाणा

शरद पवार यांची आज जळगाव जिल्ह्यातील धरणगावात प्रचारसभा पार पडली. जळगाव ग्रामीणचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा पार पडली. या सभेत कराळे गुरुजी यांनी आपल्या भाषणात अजित पवारांवर निशाणा साधला.

'लाडक्या बहिणीच्या विरुद्ध लाडकी बायको...', कराळे गुरुजींचा अजित पवारांवर खोचक शब्दांत निशाणा
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 9:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक नितेश कराळे गुरुजी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज जळगाव जिल्ह्यातील धरणगावात प्रचारसभा पार पडली. जळगाव ग्रामीणचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा पार पडली. या सभेत कराळे गुरुजी यांनी आपल्या भाषणात अजित पवारांवर निशाणा साधला. “ज्याने स्वतःची बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात बायको उभी केली होती त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडक्या बहिणीच्या विरुद्ध लाडकी बायको उभी करायची आणि त्याला नाव द्यायचं माझी लाडकी बहीण”, अशी टीका कराळे गुरुजी यांनी केली. यावेळी त्यांनी जळगाव ग्रामीणचे विद्यमान आमदार मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली.

“गुलाबराव पाटील यांना ठिकाणावर आणायचं काम तुम्हाला करायचं आहे. गुलाबराव देवकर यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं आहे. शरद पवार तुमच्यासाठी चार-चार, पाच-पाच सभा या राज्यात घेत आहेत. तुमच्याकडच्या आमदाराकडे मंत्रिपद कुठलं आहे? तर पाणीपुरवठा विभागाचं. तुमच्याच मतदारसंघात 15-15 दिवसात पाणी येते. लाज वाटायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला दोन धरण आणि तापी नदी आहे. एखादा मंत्री असता तर आपल्या मतदारसंघाचा कायापालट करून टाकला असता. ह्यांनी तुमच्या घरात पाणी आणलं नाही. ह्यांना तुम्ही पाण्यात बुचाकावून काय करायचं ते तुम्ही ठरवा”, अशी टीका नितेश कराळे गुरुजींनी केली.

कराळे गुरुजींची खोचक टीका

“पालकमंत्र्याच्या मर्जीतल्या लोकांकडून ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर वाळू भरून जातात. त्यांना काही दंड नाही. करोडो रुपयांचा महसूल गुलाबराव पाटलांनी डुबवला आहे. गुलाबराव पाटलांनी वक्तव्य केलं होतं की, आमच्या मतदारसंघातले रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत”, असा उल्लेख कराळे गुरुजींनी केला.

हे सुद्धा वाचा

लाडक्या बहिणीचे पैसे हे केव्हाही वापस मागू शकतात, याचा काही नेम नाही. या दाढीवाल्याने उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. विजय मल्ल्यासारखे, ललित मोदी सारखे काही तर पैसे घेऊन पळाले, अशी टीका कराळे गुरुजींनी केली. महायुतीच्या सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये सोयाबीनला 7 हजार रुपये भाव देणार म्हणता. मात्र सालेहो तुम्ही जो घोषित केलेला हमीभाव तर द्या, असं कराळे गुरुजी म्हणाले. “पक्ष तर चोरला पण यांनी चिन्हं पण चोरलं. बरं झालं आडनाव नाही चोरलं. आडनाव चोरलं असता तर एकनाथ शिंदे ठाकरे आणि इकडे गुलाबराव पाटील ठाकरे असं नाव झालं असतं”, अशी खोचक टीका कराळे गुरुजींनी केली.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.