नणंदेच्या टीकेला भावजयचं उत्तर; रक्षा खडसे म्हणाल्या, तुम्ही कितीही…
Raksha Khadse on Rohini Khadse and Loksabha Election 2024 : राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप काय उत्तर देणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता रक्षा खडसे यांनी यावर उत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आज सकाळीच भाजपवर जोरदार टीका केली होती. अब की बार 400 सो के पार…, असं भाजप म्हणतंय पण महाविकास आघाडी त्यांना रोखणार आहे, असं रोहिणी खडसे म्हणाल्या होत्या. त्यांच्या टीकेला आता भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. शेवटी तुम्ही विरोधक कितीही बोलत असले तरी शेवटी जनतेचा बोट हे कमळावर पडणार आहे. ते तुम्ही कसं काय थांबणार? नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून हे तुम्ही कसं काय थांबवणार? नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतीलच, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.
रोहिणी खडसे काय म्हणाल्या होत्या?
‘मुंगेरीलाल के हासीन सपने’ असाच हा 400 पारचा नारा भाजपचा राहणार आहे. कारण इंडिया आघाडीला विकास आघाडीला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या चारशे पारला महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडी थांबवेल. त्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल, असं रोहिणी खडसे म्हणाल्या. त्यांच्या टीकेला रक्षा खडसेंनी उत्तर दिलं आहे.
‘अब की बार 400 के पार’ असा नारा भाजपकडून देण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी यांनी टीका केली. महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या टीकेला आता रक्षा खडसे यांनी उत्तर दिलं आहे. रावेर लोकसभेची जागा जास्तीत जास्त मताने कशी निवडून येईल. यासाठी नाथाभाऊ जुन्या कार्यकर्त्यांना भेटून प्रयत्न करतायेत. असंही रक्षा खडसे म्हणाल्या.
रक्षा खडसे म्हणाल्या…
माझ्या विरोधात अपूर्ण व्हिडिओ व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. विरोधकांचे माझ्यावर आरोप आहेत की, विकास झालेला नाही. त्यांना मला सांगायचं आहे की माझ्या समोर येऊन बसावं. चार काम विचारतात तर 100 काम आम्ही केलेली आहेत, ती जाणून घ्या. समोरच्यांच्या डोक्यात चार काम असतील. मात्र आमच्या डोक्यामध्ये विकासाचे असंख्य काम आहेत, असं म्हणत रक्षा खडसेंनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.
रावेर लोकसभेचे विजयाचे टार्गेट आमचं पाच लाखांच्यावर आहे. मात्र साडेतीन लाखाच्या वर मात्र विजय नक्कीच होईल, असं म्हणत रक्षा खडसेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.