माझी बहिण ठाकरे गटात हे माझं दुर्दैव; आमदार किशोर पाटलांनी मांडली पहिल्यांदाच बेधडक भूमिका; पाटील म्हणतात निवडून तर मी येणारच

राजकारणात भावना सोडव्या लागतात, मी यापुढेही डंके की चोट वर निवडून येईल असा विश्वास व्यक्त करत आपल्या समोर आव्हान असलं की माणूस जोमाने कामाला लागतो, आव्हान नसलं की निवांत झोपतो, तिथंच घात होतो, आता माझ्यासमोर आव्हान असल्याने मी जोरदारपणे कामाला लागणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

माझी बहिण ठाकरे गटात हे माझं दुर्दैव; आमदार किशोर पाटलांनी मांडली पहिल्यांदाच बेधडक भूमिका; पाटील म्हणतात निवडून तर मी येणारच
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 4:21 PM

जळगावः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Vidhansabha Result 2022) शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून सत्तांतर घडवून आणले. या सत्तानाट्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊन पायउतार व्हावं लागलं. यानंतर राज्यातील राजकारणात वेगाने घडामोडी घडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र-उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामधीलच एक म्हणजे जळगाव जिल्ह्यातील आमदार किशोर पाटील (Rebel MLA Kishor Patil ) आहे. त्यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश करुन एकनाथ शिंदे गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे, ते शिंदे गटात गेले असले तरी त्यांना आता घरातूनच आव्हान मिळाले असल्याने त्यांनी आता निवडून येणारच असा शिवसेनेविरोधातच शड्डू ठोकला आहे.

आदित्य ठाकरे यांचा दौरा झाल्यानंतर आमदार किशोर पाटील यांची बहीण वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryavanshi) या शिवसेनेतच असल्याने त्यांना हा राजकीय धक्का असला तरी आपल्या बहिणीविषयी राजकीय मत व्यक्त करताना ते म्हणाले की, माझी बहिण वैशाली सूर्यवंशी ठाकरे गटात आहे हे माझं दुर्दैव असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार किशोर पाटलांनी व्यक्त केली आहे.

बहिणीचं राजकीय आव्हान

आदित्य ठाकरे यांचा दौऱा होण्याअगोदर पासूनच आमदार किशोर पाटलांनी पहिल्यांदाच बेधडक भूमिका मांडली होती. मात्र आता त्यांच्या घरातूनच त्यांना आवाहन मिळाल्यानंतर त्यांना हा राजकीय धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केल्यानंतर आमदार किशोर पाटलांना त्यांच्या घरातून बहिणीचं राजकीय आव्हान असणार असल्याने त्यांनी त्याविषयी बोलताना सांगितले की, मी शिंदे गटात आणि माझी बहीण वैशाली सूर्यवंशी शिवसेनेत आहे हेच मुळी दुर्देव असल्याचे त्यांनी सांगितले होते.

शिंदे गटात सक्रीय

आमदार किशोर पाटील यांनी यावेळी बहीण वैशाली सूर्यवंशी शिवसेनेत आणि आपण शिंदे गटात सक्रीय आहोत, त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, संकटाच्या काळात संपूर्ण मतदारसंघातील शिवसैनिक माझ्या पाठीशी उभा राहिला आहे, पण मी तिकडं असल्याचे पाहून बहिणीने ठाकरे गटात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला, पण माझी बहिण वेगळी वाट घेत आहे ही खरं म्हणजे दुर्दैवी बाब असल्याचीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राजकारणात भावना सोडव्या लागतात

राजकारणात भावना सोडव्या लागतात, मी यापुढेही डंके की चोट वर निवडून येईल असा विश्वास व्यक्त करत आपल्या समोर आव्हान असलं की माणूस जोमाने कामाला लागतो, आव्हान नसलं की निवांत झोपतो, तिथंच घात होतो, आता माझ्यासमोर आव्हान असल्याने मी जोरदारपणे कामाला लागणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.