भुसावळमध्ये लग्नाआधीच मुलीचा हुंड्यासाठी छळ, लग्न मोडण्याची धमकी; अखेर तरुणीने उचलले हे टोकाचे पाऊल

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुऱ्हे पानाचे येथील रामेश्वरी नागपुरे हिचे रावेर येथील भूषण याच्याशी लग्न ठरले होते. 6 मार्च रोजी साखरपुडा झाला होता, तर 18 मे रोजी विवाहाचा मुहूर्त काढला होता. हुंडा म्हणून तीन तोळे सोने व 50 हजार रुपये रोख लग्नाच्या दिवशी देण्याचे ठरले होते. परंतु साखरपुडा होताच काही दिवसांनी भूषण व त्याच्या आईकडून दागिने व पैशांचा तगादा सुरू झाला.

भुसावळमध्ये लग्नाआधीच मुलीचा हुंड्यासाठी छळ, लग्न मोडण्याची धमकी; अखेर तरुणीने उचलले हे टोकाचे पाऊल
भुसावळमध्ये लग्नाआधीच मुलीचा हुंड्यासाठी छळImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 3:25 PM

भुसावळ : लग्नाआधीच हुंड्या (Dowry)चे दागिने व पैशांसाठी होणारा छळ, तसेच होणाऱ्या पतीनेच जाड म्हणून हिणवले व लग्न मोडण्याची धमकी दिल्यामुळे एका उच्चशिक्षित तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना भुसावळमध्ये घडली आहे. रामेश्वरी रवींद्र नागपुरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. तरुणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, होणारा पती व सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहाचा ताबा न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. नंतर मात्र अंत्यसंस्कार करण्यात आले. (Young woman commits suicide in Bhusawal due to dowry torture)

काय आहे नेमके प्रकरण ?

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुऱ्हे पानाचे येथील रामेश्वरी नागपुरे हिचे रावेर येथील भूषण याच्याशी लग्न ठरले होते. 6 मार्च रोजी साखरपुडा झाला होता, तर 18 मे रोजी विवाहाचा मुहूर्त काढला होता. हुंडा म्हणून तीन तोळे सोने व 50 हजार रुपये रोख लग्नाच्या दिवशी देण्याचे ठरले होते. परंतु साखरपुडा होताच काही दिवसांनी भूषण व त्याच्या आईकडून दागिने व पैशांचा तगादा सुरू झाला. गेल्या आठवड्यात ‘आम्ही जळगावात आलो आहोत, आम्हाला आजच दागिने व रोख रक्कम द्या’ म्हणून सांगितले. त्यासाठी मुलीच्या घरच्यांना रावेर येथे बोलावले. तेथे दागिने व रोख रक्कम मुलाकडच्यांना देण्यात आली.

हुंडा आणि दागिने घेतल्यानंतर मुलीला शरीरावरुन हिणवले

त्यानंतर दोन-तीन दिवसांत पुन्हा भूषणकडून रामेश्वरी हिला हिणवणे सुरू झाले. तू जाड आहेस, मला आवडत नाही. मामांनी सांगितले म्हणून होकार दिला पण मी हे लग्न मोडणार आहे. आता लग्न कुन्हे गावात नाही तर भुसावळात लॉनवर करायचे असे सांगून दम देत होता. त्यानंतर तरुणीने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तरुण व त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांनी निर्णय घेतला. मात्र भुसावळ तालुका पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Young woman commits suicide in Bhusawal due to dowry torture)

इतर बातम्या

VIDEO | Dombivli मध्ये ब्युटी पार्लरमध्ये घुसलेल्या दारुड्याला महिलेचा चोप

Chandrapur Crime | दोन गांजा तस्करांना अटक, 33 लाखांचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.