Manoj Jarange : मोठी बातमी, आप राज्यात करणार मोठी खेळी? अरविंद केजरीवाल यांचा निरोप घेऊन पदाधिकारी अंतरवाली सराटीत, घडामोड काय?

AAP-Manoj Jarange Patil : राज्यात लोकसभा निवडणुकीतून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अंग काढून घेतले होते. उत्तरेत आपने पंजाबमध्ये अगोदरच सरकार आणले आहे. आता आप महाराष्ट्रात नवीन खेळी खेळण्याच्या तयारीत तर नाही ना?

Manoj Jarange : मोठी बातमी, आप राज्यात करणार मोठी खेळी? अरविंद केजरीवाल यांचा निरोप घेऊन पदाधिकारी अंतरवाली सराटीत, घडामोड काय?
आपची राज्यात मोठी खेळी?
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 2:54 PM

आम आदमी पक्ष दिल्लीत मोठ्या संकटात सापडला आहे. आपने दहा वर्षात मोठी घौडदौड केली आहे. दिल्लीनंतर पंजाब राज्य या पक्षाने खिशात घातले. तर इतर राज्यात पण चांगली उपस्थिती नोंदवली आहे. सध्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यासह इतर काही मंत्री कायदेशीर कचाट्यात अडकलेले आहे. तरीही पक्ष नाउमेद झालेला नाही. पक्षाने आता विधानसभेसाठी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले तर नाही ना? अशा काही घडामोडी राज्यात घडत आहेत.

राज्यात लोकसभेत नाही सहभाग

आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण भाजपविरोधातील इंडिया आघाडीचा प्रचार करण्याचा निर्णय जाहीर केला होता. भाजप आणि आपमध्ये गेल्या काही महिन्यापासून तिखट वार प्रतिवार सुरू आहेत. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर बड्या नेत्यांना अटक केल्याने आप-भाजप असा वाद रंगला आहे. आपचे वाढते प्रस्थ आणि आपचा प्रभाव वाढल्यानेच भाजप पक्षाविरोधात कटकारस्थान करत असल्याचा आरोप आपचे नेते करत आहेत.

हे सुद्धा वाचा

मनोज जरांगे यांची घेतली भेट

आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष अजित पाटके पाटील आणि त्यांचे पदाधिकारी जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा निरोप घेऊन आपचे पदाधिकारी अंतरवाली सराटी मध्ये दाखल झाले. विधानसभा निवडणुकी संदर्भात जरांगे पाटील आणि आपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा फॅक्टर महत्वाचा

लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरने महायुतीला मोठा फटका बसला. महाविकास आघाडीने या निवडणुकीत मोठी बाजी मारली. या निवडणुकीत डब्बल इंजिन सरकार मोठी कमाल दाखवणार अशी चर्चा होती. पण मराठा फॅक्टरने अनेक मतदारसंघातील समीकरण बदलले. मराठवाड्यात तर महायुतीला मोठा फटका बसला. शिंदे सेनेला छत्रपती संभाजीनगरची एक जागा वाचवता आली.

विधानसभेत सुद्धा मराठा फॅक्टर महत्वाचा ठरण्याची भीती सत्ताधाऱ्यांना सतावत आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाविषयी डेडलाईन दिली आहे. त्यानंतर 288 मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याची दाट शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी नुकतीच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात शांतता रॅली घेतली. त्यात सत्ताधाऱ्यांचा सुपडा साफ होण्याचा इशारा दिला आहे. या सर्व परिस्थितीत आता आप कोणती संधी शोधत आहे, हे लवकरच समोर येईल.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.