Viral Video : ग्रामस्थांनी अस्वलाला केलं मोबाइल कॅमेऱ्यात कैद, जाळीचा देव मंदिर परिसरात मुक्त संचार

भोकरदन (Bhokardan) तालुक्यातलं तीर्थक्षेत्र जाळीचादेव इथं अस्वला(Bear)च्या जोडीनं मंदिर (Temple) परिसरात प्रवेश केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अस्वल मंदिरात आल्यानंतर मंदिरातील नागरिकांनी या अस्वलांना आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केलं. या अस्वलांचा मुक्तसंचार धडकी भरवणारा आहे. स्थानिक नागरिकांनी वन विभागाला या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Viral Video : ग्रामस्थांनी अस्वलाला केलं मोबाइल कॅमेऱ्यात कैद, जाळीचा देव मंदिर परिसरात मुक्त संचार
जाळीचा देव परिसरात अस्वलांचा वावर
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 2:13 PM

जालना : भोकरदन (Bhokardan) तालुक्यातलं तीर्थक्षेत्र जाळीचादेव इथं अस्वला(Bear)च्या जोडीनं मंदिर (Temple) परिसरात प्रवेश केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अस्वल मंदिरात आल्यानंतर मंदिरातील नागरिकांनी या अस्वलांना आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केलं. या अस्वलांचा मुक्तसंचार धडकी भरवणारा आहे. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे. अस्वल दिसताच त्यांनी कॅमेऱ्यात कैद केलंय. जाळीचा देव मंदिर परिसरात नेहमीच बाजूच्या जंगलातील हिंस्र जीव येत असल्यानं स्थानिक नागरिकांनी वन विभागाला या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. परिसरात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मंदिर परिसराच्या बाजूला घनदाट झाडं आहेत. अशावेळी तिथून हे हिंस्र श्वापदं मंदिराच्या परिसरात येत असतात. (Bears roam near temple)

महानुभाव पंथीयांचं पवित्र तीर्थक्षेत्र

जाळीचा देव” हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्‍यंत महत्त्वाचं असं धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचं काही काळ वास्‍तव्‍य होतं. श्रीक्षेत्र जाळीचा देव हे अजिंठ्यापासून 28 किलोमीटरवर अंतरावर असणारं महानुभाव पंथीयांचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे.

जाळीचा देव कुठे आहे?

महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकात महाराष्ट्रभ्रमण करत होते. ते श्री चक्रधर स्वामी गंगातीराकडून हरताळा येथून स्वामी सावळतबारा इथं आले. इथून वालसाविंगीस (जि. जालना) जाताना पवथताच्या या घनदाट अरण्यात जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले. तिथं एक वाघिण आली आणि स्वामींकडे पाहत पाळीव प्राण्यांप्रमाणं शेपटी हलवू लागली. वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना ही घटना घडली, म्हणून या परिसरास जाळीचा देव म्हटलं जातं. अशा या ठिकाणी अस्वलांचा सध्या वावर वाढलाय. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतेय.

घरात घुसला कोब्रा, वाचवण्यासाठी गेलेल्या सर्पमित्रावरच करतोय हल्ला, पाहा Viral Video

Chimpanzee : धावत जाऊन चिंपांझीनं महिलेला मिठी मारली, Viral Video पाहून यूझर्स भावुक

Nagpur Butterfly Video : विदर्भातलं बोलणारं फुलपाखरू पाहिलंय? अॅपच्या माध्यमातून साधतंय संवाद

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.