ED Raid: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई!

शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (26 नोव्हेंबर) सकाळीच साडे आठ वाजल्यापासून ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात दाखल झाले. 12 जणांच्या या पथकाने घराचे दरवाजे आतून लावून घेत तपासणी केली.

ED Raid: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई!
जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 4:29 PM

जालनाः शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांच्या जालन्यातील राहत्या घरी ईडी (ED Raid) अर्थात सक्तवसुली संचलनालयाने शुक्रवारी सकाळी धाड टाकली. काही दिवसांपूर्वीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच ही छापेमारी सुरु झाली आहे.

जालन्यातील भाग्यनगर येथील घरावर छापा

शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (26 नोव्हेंबर) सकाळीच साडे आठ वाजल्यापासून ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात दाखल झाले. 12 जणांच्या या पथकाने घराचे दरवाजे आतून लावून घेत तपासणी सुरु केली आहे. यावेळी अर्जून खोतकर घरीच होते, अशी माहिती समोर आली आहे. औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यात आर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती. यापूर्वी खोतकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण भागीदार आहोत, मालक नाही, असं स्पष्टीकरण खोतकरांनी दिलं होतं.

कृषी उत्पन्न बाजार समितीची तपासणी

अर्जून खोतकर हे सध्या जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचीही ईडीकडून तपासणी करण्यात आली. जालन्यात आज सकाळीच या दोन ठिकाणी सक्तवसुली संचलनालयातर्फे धाडी टाकण्यात आल्याने शहरात एकच खळबळ माजली होती.

इतर बातम्या-

राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार; नाना पटोले म्हणतात, भाजपच्या भविष्यवाणीला काही अर्थ

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे सर्व अहवाल नॉर्मल, वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा तंदरुस्त

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.