AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna | जालन्यात तीन तालुक्यात गावठाणचे ड्रोनद्वारे मोजणीचे काम पूर्ण, आता पाच तालुक्यांची मोजणी होणार: राजेश टोपे

जालना,बदनापूर आणि अंबड तालूक्यातील नागरिकांना डिजिटल नकाशे व सनदीचे प्रतिनिधिक स्वरूपात पालकमंत्री टोपे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Jalna | जालन्यात तीन तालुक्यात गावठाणचे ड्रोनद्वारे मोजणीचे काम पूर्ण, आता पाच तालुक्यांची मोजणी होणार: राजेश टोपे
जालना, बदनापूर आणि अंबडमधील काही नगरिकांना टोपे यांच्या हस्ते नकाशाचे वितरणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 3:47 PM

जालना :  जिल्ह्यातील  जालना, बदनापूर आणि अंबड या तीन तालुक्यामधील ड्रोनद्वारे (Drone Mapping) गावठाण मोजणीचे काम अचूकपणे पूर्ण करण्यात आले असून उर्वरित पाच तालुक्यातील कामेही गतीने पूर्ण करण्यात येतील. महसूल विभागाने अत्यंत सतर्कपणे सर्वसामान्यांची कामे विनातक्रार वेळेत पूर्ण कराव्यात सूचना पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिल्या. जालन्यात आज भूमापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संवाद साधताना राजेश टोपे बोलत होते. जगात विकसित होत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा (New Technology) उपयोग करून सामान्यांना मदत होऊन त्यांचे हित जोपासणाऱ्या उपक्रमांवर भर देत जिल्ह्यातील विकास कामांना अधिक गती देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यवेळी सांगितलं.

तंत्रज्ञानाच्या मदतीने जमिनीचे वाद टळणार

जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना राजेश टोपे म्हणाले, ग्रामीण भागात जमिनीचे अनेक वाद असतात. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोनद्वारे भुमापानाचा उपक्रम सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. या उपक्रमामुळे गावठाणातील प्रत्येक मिळकतीचा नकाशा व मिळकत पत्रिका तयार होऊन जमीनीचे होत असलेले वाद यामुळे कमी होणार आहेत. ग्रामपंचायतीकडील मालमत्तापत्रक अद्यावत झाल्यामुळे महसूलात वाढ़ होण्याबरोबरच शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेवरील अतिक्रमण रोखता येणार असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके, समीर दातेकर, सी.ए. सेवक, पी.व्ही.गामने, विलास राऊत, विक्रम बनछोड आदिची प्रमुख उपस्थिती होती.

आता पाच तालुक्यांचे कामही होणार

भूमापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ड्रोनद्वारे गावठाण मोजणीच्या उपक्रमाची माहिती राजेश टोपे यांनी दिली. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून नविन्यपूर्ण योजनेतून विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यामधील ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचे काम अचूकपणे पूर्ण करण्यात आले असून उर्वरित पाच तालुक्यातील कामेही गतीने पूर्ण करण्यात यावीत. महसूल विभागाने अत्यंत सतर्कपणे सर्वसामान्यांची कामे विनाताक्रार वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी दिल्या. यावेळी जालना,बदनापूर आणि अंबड तालूक्यातील नागरिकांना डिजिटल नकाशे व सनदीचे प्रतिनिधिक स्वरूपात पालकमंत्री टोपे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

इतर बातम्या-

Pakistan Political Crisis : हेलिकॉप्टर आलं आणि इम्रान खान यांचा गेम पलटला, बाजवांचा बळी देण्याचा प्रयत्न हुकला

अकोल्यात दारूविक्री विरोधात महिला आक्रमक; वाहतूक करणाऱ्याची दुचाकीसह दारू पेटवली!

लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.