Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna VIDEO | नेत्रालयाचं शटर उचकटून चोर आत शिरला, CCTV मध्ये कैद, जालन्यात 32 हजार रुपये चोरीला

पहाटेच्या वेळी झालेल्या चोरीचा तत्काळ तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. त्यात चेहरा संपूर्णपणे झाकलेला चोर शटर उचकटून आत येताना दिसतो.

Jalna VIDEO | नेत्रालयाचं शटर उचकटून चोर आत शिरला, CCTV मध्ये कैद, जालन्यात 32 हजार रुपये चोरीला
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 11:55 AM

जालनाः जालन्यात एका नेत्रालयात (Eye Hospital) चोरी झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे तीन वाजता नेत्रालयाचं शटर उचकटून चोरानं आतमध्ये प्रवेश केला. आतमधील ड्रॉवरही लॉक (Lock) केलेले होते. चोराने स्वतःसोबत आणलेल्या कटरच्या मदतीने लॉकर्सही उघडले. यातून पैसे चोरले. नेत्रालयातील इतरही ड्रॉवर्स त्याने उघडून पाहिले. टॉर्चच्या मदतीने सर्वत्र नजर टाकल्याचं सीसीटीव्हीत (Theft in CCTV) दिसत आहे. आज सकाळी नेत्रालयाचं शटर उघडलेलं दिसून आल्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेत 32 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.  जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील बालाजी नेत्रालयात सदर घटना घडली. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरट्याने आत प्रवेश करून येथील रक्कम लंपास केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

व्हिडिओत काय दिसतंय?

पहाटेच्या वेळी झालेल्या चोरीचा तत्काळ तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. त्यात चेहरा संपूर्णपणे झाकलेला चोर शटर उचकटून आत येताना दिसतो. दुकानातील सर्व ड्रॉवर्सवर गोल फिरून नजर टाकल्यानंतर या चोरानं मुख्य ड्रॉवर्स उघडायला घेतले. सोबत आणलेल्या कटरने त्याने ड्रॉवर उघडला. त्यातील पैसे स्वतःच्या खिशात टाकले. त्यानंतर वरील आणखी एक ड्रॉवर उघडून पाहिला. खोलीतील इतरही ठिकाणी टॉर्च घेऊन नजर फिरवली आणि चोर तेथून निघून गेला. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक.