Video : एसटी स्टॅंडवर एअरपोर्ट सारख्या सुविधा! पाहा कसंय घनसावंगीचं हायटेक एसटी स्टँड

गेल्या अनेक दिवसांपासून बोलले जात आहे की, एसटी बसस्थानकाचे लूक चेंज होणार आहे. एसटीही आता अत्याधुनिक होणार आहे. मात्र, हे कधी घडणार याची वाट गेल्या अनेक दिवसांपासून बघितली जात होती.

Video : एसटी स्टॅंडवर एअरपोर्ट सारख्या सुविधा! पाहा कसंय घनसावंगीचं हायटेक एसटी स्टँड
एसटी बस स्टॅन्डचा प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 6:47 AM

मुंबई : बसस्थानक (Busstation) म्हटले की, आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते अस्वच्छ बाक, स्टँडला सात ते आठ एसटी बस लागलेल्या. त्यानंतर काही विक्रेते आणि थुंकून रंगवलेल्या भिंती. कारण गेल्या काही दिवसांपासून एसटीला अच्छे दिवस आलेच नाहीयेत. एसटी विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही तुटपूंजा पगार मिळतो. शासनाच्या (Government) जवळपास सर्वच विभागांची प्रगती झालीये. मात्र, लालपरीची अजूनही खरखर संपलीच नाहीये. गेल्या काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यानेच नव्हेतर देशानेच एसटी कर्मचाऱ्यांचा (ST staff) संप बघितला. या संपामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. शेवटी हाती काहीच मिळाले नाही. एसटी संपादरम्यान अनेक कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आली. मागण्यापूर्ण न होताच कर्मचाऱ्यांना निराश होऊन शेवटी कामावर परतावेच लागले.

गेल्या अनेक दिवसांपासून बोलले जात आहे की, एसटी बसस्थानकाचा लूक चेंज होणार आहे. एसटीही आता अत्याधुनिक होणार आहे. मात्र, हे कधी घडणार याची वाट गेल्या अनेक दिवसांपासून बघितली जात होती. आता यासंदर्भातचे एक पाऊल राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या जिल्हातूनच टाकण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

राजेश टोपे यांनी शेअर केला व्हिडीओ

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगी येथे अत्याधुनिक पद्धतीने विकसित असे अद्ययावत बसस्थानक उभारण्यात येणार आहे. ज्याचे भूमिपूजनही नुकताच करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आता मंत्र्याचा जिल्हा म्हटंल्यावर कामही प्रगतीपथावर होण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जाते आहे.

राजेश टोपे यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

घनसावंगी बसस्थानकाचे रूपडेच आता पालटणार आहे. या बसस्थानकामध्ये आता अत्याधुनिक सर्व सुविधा प्रवाश्यांना मिळणार आहेत. असे हायटेक बसस्थानक कदाचित राज्यातील पहिलेच असेल. विमानतळावर असणाऱ्या व्हिडिओ वॉल, व्यापारी संकुल, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजे घनसावंगी बसस्थानकावर आल्यावर विमानतळावर आल्याचा फिल प्रवाश्यांना मिळणार हे नक्की. राजेश टोपे यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. इतकेच नाहीतर त्यांनी घनसावंगी बसस्थानकाचा एक व्हिडीओही शेअर केलाय.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...