जरांगेंच्या भेटींचा सिलसिला…; संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अंतरवलीत, नव्या आघाडीची चिन्हे?

Manoj Akhre Meets Manoj Jarange Patil : राज्यातील अनेकजण मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंच्या भेटीला येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. वाचा सविस्तर...

जरांगेंच्या भेटींचा सिलसिला...; संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अंतरवलीत, नव्या आघाडीची चिन्हे?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 7:59 AM

राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत यंदा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्वाची असणार आहे. काही जागांवर उमेदवार देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अनेकजण अंतरवलीत येत आहेत. अशातच संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष मनोज आखरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. संभाजी ब्रिगेडची महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरु होती. मात्र जागावाटपावरून बिनसल्याने संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची असणार आहे. संभाजी ब्रिगेड आणि जरांगे एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

मनोज जरांगे- आखरेंची भेट

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत्या भेटीवर मनोज आखरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी ब्रिगेड एक संघटन आणि राजकीय पक्ष आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा. तसंच ओबीसींची संरक्षण व्हावं. हे मुद्दे घेऊन संभाजी ब्रिगेड केल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. तीच भूमिका जरांगे पाटील यांनीही घेतली आहे, असं मनोज आखरे म्हणाले.

समविचारी लोकांशी चर्चा करून पुढील राजकीय भूमिका प्रश्न मार्गी लावायचे असेल तर विधानसभेत आपली माणसं पाहिजेत. आपला झेंडा आपला अजेंडा ही भूमिका पाहिजे. याबाबत पुढे निर्णय होईल आणि त्या अनुषंगाने पुढे वाटचाल चालू होईल, असं त्यांनी म्हटलं.

“चर्चा करून उमेदवार ठरवू”

मनोज जरांगे पाटील आणि आमच्या समन्वय चांगला आहे. संभाजी ब्रिगेडने जाहीर केलं आहे की, या लोकशाहीच्या महोत्सवात आम्ही स्वतंत्र सामील होणार आहोत. जरांगे पाटील यांनीही जाहीर केलं आहे की उमेदवार दिल्याशिवाय पर्याय नाही आणि जी भूमिका जरांगे पाटलांची तीच भूमिका आमची आहे. विधानसभेत समाजाचे प्रश्न मांडणारे लोक गेले पाहिजेत. योग्य उमेदवार देण्याबाबत आम्ही पुढे चर्चा सविस्तर करू. जरांगे पाटील यांच्याकडेही आणि आमच्याकडे ही उमेदवार येतात. परंतु आम्ही ठरवून उमेदवार देऊ, असंही मनोज आखरे यांनी यावेळी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.