“जे आम्हाला जातीयवादी म्हणताहेत, ते आमच्या पंगतीत बसून जेवले आणि…”; विरोधकांच्या आरोपांना भाजपनं जशास तसं उत्तर दिलं

हे जे आम्हाला जातीयवादी म्हणत आहेत ना ते आमच्या पंगतीत बसून जेवले आहेत, आणि खरकटे तोंड घेऊन कुणीकडे गेले आहेत पहा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

जे आम्हाला जातीयवादी म्हणताहेत, ते आमच्या पंगतीत बसून जेवले आणि...; विरोधकांच्या आरोपांना भाजपनं जशास तसं उत्तर दिलं
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 6:43 PM

जालना : देशाच्या राजकारणात भाजपला रोखण्यासाठी म्हणून विरोधकांची मूठ बांधण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवर केलं जाते आहे. देशातील भाजपविरोधात असणाऱ्या पक्षांनी एकत्र येत भाजपविरोधात आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न झाला आहे. विरोधकांनी बांधलेली मोट यशस्वी होईल न होईल मात्र विरोधकांच्या या प्रयोगावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, विरोधक तिसरी आघाडीचा विचार करत असले तरी ते त्यामध्ये कधीही यशस्वी होणार नसल्याचे सांगत त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यामुळे विरोधकांचा हा प्रयोग फसला असून आगामी निवडणुकीतही म्हणजेच 2024 मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास दानवे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून तिसऱ्या आघाडीचा सडकून समाचार घेण्यात आला असून विरोधक त्यांच्या त्या प्रयोगमध्ये कधीच यशस्वी होणार नाहीत असंही त्यांनी विश्वासानं सांगितलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी जरी आघाडीचा प्रयत्न केला असला तरी 2024 मध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मात्र नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ नये म्हणून आता विरोधी पक्ष आओ चोरो बांधो भारा, अधा तुम्हारा-आधा हमारा अशी परिस्थिती विरोधकांची झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचा जो कर्नाटकात विजय झाला आहे, त्यासाठी तिथे सर्व गोळा झाले होते असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

यावेळी विरोधकांच्या प्रयोगावर टीका करताना म्हणाले की, ममता बॅनर्जी म्हणतात भाजपा जातीयवादी आहे, शरद पवार म्हणतात भाजपा जातीयवादी आहे, मायावती म्हणतात भाजप जातीयवादी आहे, फारूक अब्दुल्ला म्हणतात जातीयवादी आहेत.

मग आम्ही जातीयवादी आहोत तर, मी आणि शरद पवार पुलोदमध्ये एकत्र निवडणूक लढवली होती, फारूक अब्दुल्ला यांचा मुलगा अटलजींच्या सरकारमध्ये मंत्री मंडळात होते, तर मायावती दोनदा मुख्यमंत्री भाजप सोबत झाल्या होत्या, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत रेल्वे मंत्री होत्या, नितीशकुमार भाजपच्या भरवशावर मुख्यमंत्री झाले होते असं सांगत त्यांनी विरोधकांचा सगळा त्यांनी इतिहासच वाचून दाखवला आहे.

हे जे आम्हाला जातीयवादी म्हणत आहेत ना ते आमच्या पंगतीत बसून जेवले आहेत, आणि खरकटे तोंड घेऊन कुणीकडे गेले आहेत पहा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

त्यामुळे विरोधक आमच्या मागे काय लागतात या देशात तीनदा आघाडीचा प्रयोग झाला आहे पण एकदाही आघाडी यशस्वी झाली नाही अशी सडकून टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.