कोल्हापूरचे सुपुत्र जवान विनय भोजे यांचा जम्मू काश्मीरमध्ये मृत्यू; अवघ्या काही दिवसांमध्येच होणार होते निवृत्त, गावावर शोककळा
हातकणंगले तालुक्यातील तिळवणी गावचे रहिवाशी जवान विनय भोजे यांचा जम्मू -काश्मीरमध्ये सेवा बजावताना मृत्यू झाला आहे. अवघ्या 37 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली. विनय भोजे हे सध्या जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते.

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तिळवणी गावचे रहिवाशी जवान विनय भोजे ( Vinay Bhoje) यांचा जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) सेवा बजावताना मृत्यू झाला आहे. अवघ्या 37 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली. विनय भोजे हे सध्या जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. जम्मू -काश्मीरमध्ये थंडीची तीव्र लाट आहे. तापमान शुन्य सेल्सिअस अंशाच्या देखील खाली आहे. अशा कठिण परिस्थितीमध्ये विनय भोजे हे सीमेवर देशाचे संरक्षण करत होते. मात्र याचदरम्यान ऑक्सिजनची पातळी कमी झाली (Oxygen levels decreased) त्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला, आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने हातकणंगले तालुक्यासह जिल्ह्यातवर शोककळा पसरली आहे.
यंदा होणार होते निवृत्त
जवान विनय भोजे-पाटील हे भोज गावचे सुपुत्र असले तरी ते तिळवणी गावामध्ये वास्तव्यास होते. तेथूनच ते सैन्यदलात भरती झाले होते. विनय भोजे-पाटील हे येत्या मार्च 2022 ला सैन्यदलातून निवृत्त होणार होते. पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या निधनाची माहिती कळताच भोजवाडी, तिळवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
विनय भोजे यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांचे पार्थीव तिळवणी येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विनय भोजे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. भेजे यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
बायको मुलांना विष दिलं, मग स्वतः गळफास घेतला! नागपुरात अख्ख्या कुटुंबानं का केली आत्महत्या?
चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात आरोपीचा बँकेच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद