जयंत पाटील यांचे एकाच दगडात दोन पक्षी, धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख प्रकरणावर प्रतिक्रिया

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर काल (12 जानेवारी) करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली (Jayant Patil on Dhananjay Munde)

जयंत पाटील यांचे एकाच दगडात दोन पक्षी, धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख प्रकरणावर प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 4:37 PM

अहमदनगर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर काल (12 जानेवारी) करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहमदनगर येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली (Jayant Patil on Dhananjay Munde).

“राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. धनंजय मुंडेनी आपली भुमिका स्पष्ट केलीय. हायकोर्टात देखील यापुर्वीच अर्ज दाखल केला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. अंतर्गत कुटुंबातील बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणे योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत‌ चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे”, असं मत त्यांनी मांडलं (Jayant Patil on Dhananjay Munde).

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतली मंडळी काय बोलणार, काय प्रतिक्रिया देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी “धनंजय मुंडे यांचं हे कौटुंबिक प्रकरण आहे. याविषयावर मी अधिक काही बोलणार नाही. याविषयी तेच बोलतील. परंतु त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणातून त्यांची बाजू समजलेली आहे”, असं मलिक म्हणाले.

दुसरीकडे हिंदु धर्मात दोन लग्न किंवा पत्नी पत्नी कायद्याने गुन्हा आहे, अशी भूमिका भाजपच्या महिला आघाडीने घेत मुंडे यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपला टोला लगावलाय. “भाजप महिला आघाडीच्या भूमिकेनंतर भाजपच्या नेत्यांना आता टेन्शन आलं असेल”, असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावलाय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेनंतर मुंडे प्रकरणी शिवसेना काय भुमिका घेते, याकडे लक्ष लागलं असतानाच एकनाथ शिंदे यांनी मात्र याविषयावर न बोलता ‘नो कॉमेंट्स’चा पवित्रा घेतला. आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार याप्रकरणी काय भुमिका घेतात, तसंच पुढे काय पाऊल टाकतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, दत्तामामा म्हणाले ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. विरोधी पक्षनेता आणि राजकारणी म्हणून धनंजय मुंडे यांचे कार्य मोठे आहे. मी छोटा माणूस आहे. धनंजय मुंडे हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यावर मी अधिक बोलणे योग्य ठरणार नाही.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. इतिहासात असे अनेक दाखले सापडतील, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. या प्रकरणाची सतत्या पडतळल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असे भरणे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.