Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस म्हणाले, डंके की चोटपर सांगतो the kashmir files बघायला गेलो, जयंत पाटील म्हणतात, इंटरव्हलनंतर सिनेमा खूपच बोअरींग

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात आज विधानसभेत द काश्मीर फाईल्स सिनेमावरून शाब्दिक कोटी रंगली. देवेंद्र फडणवीस यांनी डंके की चोटपर सांगतो काल आम्ही सर्वजण द काश्मीर फाईल्स हा सिनेमा बघायला गेलो होतो.

फडणवीस म्हणाले, डंके की चोटपर सांगतो the kashmir files बघायला गेलो, जयंत पाटील म्हणतात, इंटरव्हलनंतर सिनेमा खूपच बोअरींग
फडणवीस म्हणाले, डंके की चोटपर सांगतो the kashmir files बघायला गेलो, जयंत पाटील म्हणतात, इंटरव्हलनंतर सिनेमा खूपच बोअरींगImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 1:17 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांच्यात आज विधानसभेत द काश्मीर फाईल्स (the kashmir files) सिनेमावरून शाब्दिक कोटी रंगली. देवेंद्र फडणवीस यांनी डंके की चोटपर सांगतो काल आम्ही सर्वजण द काश्मीर फाईल्स हा सिनेमा बघायला गेलो होतो. त्यामुळे विधानसभेत नव्हतो, असं स्पष्ट केलं. त्यावर जयंत पाटील यांनी फडणवीसांची फिरकी घेतली. ‘काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा मध्यांतरानंतर बोअरींग आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही. फक्त निर्मात्याकडे 160 कोटी जमा झाले आहेत. त्यातून काश्मीर पंडितांना घर बांधण्यासाठी दान करायला सांगा, अशी मागणी जयंत पाटील यांनी आज सभागृहात केली. त्यामुळे भाजप सदस्यांनी गोंधळास एकच सुरुवात केली.

विधानसभेचं काम काज सुरू झालं तेव्हा कोणत्या सदस्यांना बोलण्यासाठी किती वेळ मिळतो यावर चर्चा सुरू झाली. देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सदस्यांना बोलण्यास देण्याची विनंती केली. तसेच विरोधकांना बोलवण्यास वेळ दिला जात नसल्याचं सांगितलं. त्यावर काल सभागृहात भाजपचे सदस्य उपस्थित नव्हते असे जयंत पाटील म्हणाले. पाटील यांनी हे विधान करताच फडणवीस बोलायला उभे राहिले. आम्ही ‘काश्मीर फाईल्स’ बघायला गेलो होतो ‘डंके के चोटे पे’ गेलो होतो. काय आक्षेप घ्यायचा त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे असे फडणवीसांनी सांगितले. त्यावर पाटील यांनी फडणवीसांची काश्मीर फाईल्सवरून फिरकी घेतली.

आम्ही खाली बसून बोललो तर अडचण होईल

‘काश्मीर फाईल्स’ वर जयंत पाटील बोलत असतानाच भाजप आमदार योगेश सागर खाली बसून जोरजोरात बोलून डिस्टर्ब करत होते. हा प्रकार लक्षात येताच जयंत पाटील संतापले. खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा. आम्हालाही खाली बसून बोलता येते, त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका, असे खडेबोलच पाटील यांनी सागर यांना सुनावले. सभागृहात पहिल्यांदाच शांत असणारे जयंत पाटील संतापलेले पाहायला मिळाले. यावेळी ‘काश्मीर फाईल्स’वरून जयंत पाटील विरुद्ध फडणवीस व भाजप सदस्य अशी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या:

नवीन आर्थिक वर्षांत मुंबईकरांवर property tax वाढीचा बोजा, 1 एप्रिलपासून नवीन मालमत्ता कर वसुली

Maharashtra News Live Update : मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील इमारतीला भीषण आग, घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात

मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील इमारतीला भीषण आग, घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.