AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जलयुक्त शिवाराची ओपन चौकशी होईल; भाजपने घाबरून जाऊ नये; जयंत पाटलांचा खोचक टोला

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेत अनेक त्रुटी असून या योजनेच्या खर्चावरही कॅगने ताशेरे ओढले आहे.

जलयुक्त शिवाराची ओपन चौकशी होईल; भाजपने घाबरून जाऊ नये; जयंत पाटलांचा खोचक टोला
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 6:52 PM

मुंबई: जलयुक्त शिवार योजनेतील त्रुटीवर कॅगने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाची खुली चौकशी होणार असून भाजपने नाराज होऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये, असा खोचक टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. (jayant patil taunts bjp)

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेत अनेक त्रुटी असून या योजनेच्या खर्चावरही कॅगने ताशेरे ओढले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चौकशीच्या फेऱ्या अडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपला टोले लगावले.

कॅगने जलयुक्त शिवार योजनेच्या काही त्रुटींवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाची खुली चौकशी करण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला. या चौकशीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. या योजनेवर कॅगने ताशेरे ओढल्यानंतरही चौकशी नाही केली तर जनता आम्हाला जाब विाचरेल. त्यामुळे चौकशी करणे गरजेचं आहे. ही चौकशी होत असल्याने भाजपने नाराज होऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये, असा चिमटाही त्यांनी काढला. जलयुक्त शिवाराबाबत फडणवीसांचं सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे की कॅगचं सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. (jayant patil taunts bjp)

कायद्यानुसार चौकशी: भुजबळ

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटल भूजल योजनेवर चर्चा सुरू असतानाच पाण्याची पातळी वाढविण्यावर चर्चा झाली. त्यात कॅगने जलयुक्त शिवार योजनेवर ओढलेल्या ताशेऱ्यांचाही विषय आला. त्यामुळे जे कायदे आहेत. त्यानुसार चौकशी होणार आहे, असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

तसेच ओबीसींच्या ज्या मागण्या आहेत. त्या जाहीर करण्याची मागणीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यता आली. ओबीसी उपसमितीची सोमवार आणि मंगळवारी बैठका होणार आहे. त्यात हे विषय मार्गी लागतील, असंही ते म्हणाले.

कॅगच्या अहवालाच्या आधारेच चौकशी : गुलाबराव पाटील

जलयुक्त शिवार योजनेसाटी 9 हजार कोटी रुपये वापरले होते. परंतु पाण्याची पातळी काही वाढली नाही. त्यावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे कॅगच्या अहवालाच्या आधारेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे, असं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. मग योजनेच्या पूर्वी दीड हजार टँकर लागत होते, आता पाच हजार टँकर का लागतात? असा सवालही पाटील यांनी केला.

दरम्यान, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालं आहे. केळी, कापूस आणि सोयाबीन पिकांचे पंचनामे केले जाणार असून शेतकऱ्यांना योग्य तो दिलासा दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (jayant patil taunts bjp)

संबंधित बातम्या:

ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी

राज्यातील गावं दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट असफल, जलयुक्त शिवार योजनेवर कॅगचा ठपका

(jayant patil taunts bjp)

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.