मविआच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत जयंत पाटील यांची नवी माहिती, कोणाला किती जागा मिळणार?

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, महाविकास आघाडीच्या जागा वाटापच्या फॉर्म्युल्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

मविआच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत जयंत पाटील यांची नवी माहिती, कोणाला किती जागा मिळणार?
Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 6:06 PM

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अनेक मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र  अजूनही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला निश्चित होताना दिसत नाहीये. सुरुवातील 85-85-85 असा जागा वाटापाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. मात्र उर्वरीत जागांचा तिढा सुटत नव्हता. त्यानंतर माहविकास आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना प्रत्येकी 90 आणि उर्वरीत 18 जागा या मित्र पक्षांना असा फॉर्मुला ठरल्याची माहिती समोर आली होती.

परंतु आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अद्याप  कोणताही जागा वाटपाचा निश्चित फॉर्म्युला ठरला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी याच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी देखील जाहीर केली. ज्यामध्ये 22 उमेदवारांची नावं आहेत.

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाडक्या बहिणींना फक्त निवडणुकीपूरतच गोंजारण्याचं काम सुरू आहे. सरकार लाडक्या बहिणींना कसं वागवत हे दिसून येत आहे. कापूस आणि सोयाबिण पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला. दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी 

1. 6 एरंडोल सतीश अण्णा पाटील 2. 111 गंगापूर सतीश चव्हाण 3. 135 शहापूर पांडुरंग बरोरा 4. 243 परांडा राहुल मोटे 5. 230 बीड संदीप क्षीरसागर 6. 44 आर्वी मयुरा काळे 7. 116 बागलान दीपिका चव्हाण 8. 119 येवला माणिकराव शिंदे 9. 120 सिन्नर उदय सांगळे 10. 122 दिंडोरी सुनीता चारोस्कर 11. 123 नाशिक पूर्व गणेश गीते 12. 141 उल्हासनगर ओमी कलानी 13. 195 जुन्नर सत्यशील शेरकर 14. 206 पिंपरी सुलक्षणा शीलवंत 15. 211 खडकवासला सचिन दोडके 16. 212 पर्वती अश्विनीताई कदम 17. 216 अकोले श्री अमित भांगरे 18. 225 अहिल्या नगर शहर अभिषेक कळमकर 19. 254 माळशिरस उत्तमराव जानकर 20. 255 फलटण दीपक चव्हाण 21. 271 चंदगड नंदिनीताई भाबुळकर कुपेकर 22. 279 इचलकरंजी मदन कारंडे

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.