जितेंद्र आव्हाडांची समजूत काढण्याचा प्रयत्न, पवारांसोबत तासभर चर्चा, खडसेंच्या प्रवेशासाठी कार्यकर्ते ताटकळत
आव्हाडांकडे गृहनिर्माण खातं आहे. ते आपलं खातं देण्यासाठी तयार नसून यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते शरद पवार यांच्याकडे गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी आव्हाडांच्या चेहऱ्यावर तणाव असल्याचंही दिसत होतं.
मुंबई : एकनाथ खडसे यांना जितेंद्र आव्हाडांचं गृहनिर्माण खातं देणार असल्याची चर्चा असताना सध्या शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बऱ्याच वेळेपासून चर्चा सुरू आहे. गेल्या अर्ध्यातासापासून ही चर्चा सुरू असून आणखी लांबणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांची पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची सुत्रांची माहिती आहे. आव्हाडांकडे गृहनिर्माण खातं आहे. ते आपलं खातं देण्यासाठी तयार नसून यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते शरद पवार यांच्याकडे गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी आव्हाडांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. (jitendra awhad met sharad pawar before khadse ncp entry)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यकर्मात शरद पवार उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी वायबी इथं फोन केल्याचंही सांगण्यात येत आहे. पक्ष कार्यालयातून फोन आल्याशिवाय निघू नका, अशी माहीती त्यांनी दिली.
खरंतर, कृषीमंत्रीपद किंवा गृहनिर्माण मंत्रिपद खडसेंना देणार अशी चर्चा आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे कृषीमंत्रिपद सोपवले जाणार, असे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, शिवसेना कृषीमंत्रिपद सोडायला तयार नाही, अशी माहिती आता पुढे येत आहेत. तसेच खडसे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी स्वत:चे स्थान सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हेदेखील अनुत्सुक असल्याचे समजते.
‘भाजपचं नमोहरण करण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरेंवर दबाव टाकू शकतात’
दरम्यान, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार आहेत. ते जो निर्णय घेतील, जो आदेश देतील त्याचं पालन करणं हे शिवसैनिकाचं काम आहे आणि दादा भूसे एक शिवसैनिक आहे’, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
एकनाथ खडसे यांचा थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं की नियोजन मंडळावर त्यांची वर्णी लावायची, याबाबत महाविकास आघाडीत संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, शिवसेना कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडही आपल्याकडील गृहनिर्माण खातं खडसेंना देण्यास तयार नसल्याचं कळतंय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“शिवसेना इगो सोडून खडसेंना कृषिमंत्रीपद देईल का हा प्रश्नच”
(Jitendra Awhad met Sharad Pawar before Khadse ncp entry)