‘आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, नंतर बाळाला जन्म’, कर्तव्यदक्ष डॉक्टरांना जितेंद्र आव्हाडांचा सलाम

प्रसुतीच्या काही तास आधीपर्यंत कोरोना निदानासाठी कीटचं संशोधन करणाऱ्या महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलं आहे (Jitendra Awhad salute Virologist of My Lab).

'आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, नंतर बाळाला जन्म', कर्तव्यदक्ष डॉक्टरांना जितेंद्र आव्हाडांचा सलाम
Follow us
| Updated on: Mar 28, 2020 | 12:55 PM

मुंबई :  प्रसुतीच्या काही तास आधीपर्यंत कोरोना निदानासाठी किटचं संशोधन करणाऱ्या महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलं आहे (Jitendra Awhad salute Virologist of My Lab). मिनल भोसले यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर आपल्या बाळाला जन्म दिला असं म्हणत आव्हाड यांनी त्यांच्या कामाला सलाम केला. विषाणूतज्ज्ञ मिनल भोसले मायलॅब या फार्माकंपनीत संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख म्हणून काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमनेच भारतातील पहिल्या ‘कोरोना टेस्ट किट’चा शोध लावला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भासले यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला. पुण्याच्या डॉ. मीनल दाखवे भोसले यांचे अनंत आभार. अशा कर्तव्यनिष्ठ माणसांसमोर मान आदराने झुकते.”

मायलॅबची कोरोना किट ही केवळ दोन ते अडीच तासांमध्ये संबंधित नमुना कोरोना पॉझिटीव्ह आहे की नाही याचा रिपोर्ट देते. परदेशातून मागवलेल्या आणि सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या किट्सला हाच रिपोर्ट द्यायला साधारण 6 ते 7 तास लागतात, अशीही माहिती मिनल भोसले यांनी दिली आहे. या किटला ‘पॅथो किट’ असं नाव देण्यात आलं आहे. या किटची निर्मिती 6 आठवड्यांच्या विक्रमी कमी वेळात केली आहे. सामान्यपणे यासाठी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागतो.

मिनल भोसले एकाच वेळी दोन पातळीवर संघर्ष करत होत्या. एकीकडे त्या स्वतः गर्भवती होत्या. प्रसुतीची वेळ जवळ येत असतानाही दुसरीकडे त्या आपल्या टीमसोबत सातत्याने कोरोना निदानाची किट शोधण्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्यांनी मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत काम सुरु केलं. विशेष म्हणजे याच्या एक दिवस आधीच त्यांच्या आरोग्याबाबत काही गुंतागुंत झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं होतं. यानंतरही त्यांनी या आरोग्य आणीबाणीचा काळ ओळखून या किटवर काम करण्याचा निर्णय घेतला.

‘राष्ट्रीय विषाणू संस्थेचे निकष 100 टक्के पूर्ण’

यावर बोलताना मिनल म्हणतात, “हा एक आणीबाणीचा काळ होता. त्यामुळे या काळात मी आव्हान म्हऊन हे काम करण्याचं ठरवलं. मला माझ्या देशासाठी काही योगदान द्यायचं होतं. माझ्या 10 सहकाऱ्यांच्या टीमने हे काम यशस्वी केलं.” प्रसुतीच्या 1 दिवस आधीच (18 मार्च) त्यांनी या कोरोना किटचं काम पूर्ण करुन त्याच्या मान्यतेसाठी ते राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी) पाठवलं. याआधी मिनल यांच्या टीमने पूर्ण मेहनत घेऊन संबंधित किट सर्व निकषांवर सिद्ध होईल याची काळजी घेतली. त्यासाठी अनेक चाचणी घेण्यात आल्या होत्या. यानंतर राष्ट्रीय विषाणू संस्थेने देखील ही किट 100 टक्के निकष पूर्ण करत असल्याचं सांगत त्याला मान्यता दिली.

आम्ही एका आठवड्यात 1 लाख कोरोना किट पुरवू शकतो आणि गरज पडल्यास 2 लाख किटचं उत्पादन करु शकतो, असं मायलॅब कंपनीने सांगितलं आहे. याच कंपनीने याआधी एचआयव्ही आणि हेपाटीटीस बी व सी आणि इतर आजारांच्या निदानाच्या किटही यशस्वीपणे बनवल्या आहेत.

परदेशी किटच्या तुलनेत प्रचंड स्वस्त दरात कोरानाचं निदान

कोरोनाचं निदान करणाऱ्या परदेशातील किट ज्या सध्या भारतात वापरल्या जात आहेत. त्या एका किटची किंमत 4 हजार 500 रुपये आहे. मात्र स्वदेशी मायलॅबच्या या किटची किंमत केवळ 1200 रुपये आहे. ही एक किट तब्बल 100 नमुन्यांची चाचणी घेऊ शकते.

संबंधित बातम्या :

Corona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

राज्यात एकाच वेळी 11 हजार कैद्यांना पॅरोल, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

देशभरात संचारबंदी, मुंबईतून हजारो कामगारांचा राजस्थानकडे पायी प्रवास

Jitendra Awhad salute Virologist of My Lab

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.