न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा दिला पाहिजे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे मत
मी सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या या कृतीचा अभिनंदन करतो. त्यातून आमच्या न्याय व्यवस्थेचा आत्मा पारदर्शक असल्याचा संदेश जातो. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा आपल्या संसदेच्या सदस्यांनी याबाबत कृती केली पाहिजे, असे उज्जवल निकम यांनी म्हटले.

Justice Yashwant Verma: न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणावरुन देश हादरला आहे. त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाल्याची बातमी आले. त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. या प्रकरणात चौकशी सुरु झाली आहे. त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणीही संसदेत झाली होती. या प्रकरणावर राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही भूमिका मांडली आहे. त्यांनी न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्या प्रकरणावर बोलताना सांगितले की, मी सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या या कृतीचा अभिनंदन करतो. त्यातून आमच्या न्याय व्यवस्थेचा आत्मा पारदर्शक असल्याचा संदेश जातो. एखाद्या देशाची स्थिरता ही प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून आहे. सामान्य माणसाचा त्या देशातील न्यायव्यवस्थाची विश्वास असला पाहिजे. हा विश्वास कमी झाला तर त्या देशात अरजागता येऊ शकते. यामुळे आजही लोकांच्या मनात शेवटचा आशेचा किरण न्यायपालिका म्हणजे न्यायव्यवस्था आहे.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी राजीनामा द्यावा
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा आपल्या संसदेच्या सदस्यांनी याबाबत कृती केली पाहिजे, असे उज्जवल निकम यांनी म्हटले. नागपूर दंगल आणि मालेगाव कनेक्शन यावर बोलताना ते म्हणाले, नागपूरचा झालेला हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. या हिंसाचार प्रकरणात ज्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केलेला आहे, त्यांच्याकडून ती नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची मालमत्तेची विक्री केली जाणार आहे. कायद्याने तसा अधिकार शासनाला दिला आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी देखील अशा प्रकारचे जिथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते, तेथे भरपाईचे आदेश दिले आहेत, असे निकम यांनी म्हटले.




महाराष्ट्र हा एक चांगला राज्य म्हणून या देशात परिचित आहे. परंतु काही उपद्रवी माणसांच्या विधानांमुळे या प्रकारच्या गोष्टी होत असतील तर त्यांनी देखील हे प्रकार थांबवले पाहिजे. कारण यामुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकाला गालबोट लागलेले आहे, असे उज्जवल निकम यांनी म्हटले.