भाजपचं टेन्शन वाढलं, देशातल्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राव यांची गर्जना
भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी आणि राव यांनी संयुक्त पत्रकार परिषदत घेत देशातल्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रतून झाली आहे. अशी हाक दिली.
मुंबई : आज तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची भेट झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी आणि राव यांनी संयुक्त पत्रकार परिषदत घेत देशातल्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रतून झाली आहे. अशी हाक दिली. या भेटीने राजाकारणातला सस्पेन्स सकाळपासूनच वाढवला होता. त्यानंतर या पत्रकार परिषदेची सुरूवात संजय राऊतानी (Sanjay Raut) केली. देशाच्या राजकारणाबाबत आणि परिस्थितीबाबत मी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे राव यांनी सांगितलं. देशाच्या विकासावर आणि येणाऱ्या काळातील दिशेबाबत चर्चा झाली. सर्व विषयांवर बातचीत झाल्याचे आणि एकमत झाल्याचे राव यांनी सांगितले. देशात पुढे एकत्र काम करणार असल्याचेही राव यांनी सांगितले. तसेच यानंतरही या नेत्यांच्या भेटीगाठी होणार आहेत.
देशातल्या परिवर्नाची सुरूवात महाराष्ट्रातून
आम्ही दोघं भाऊ लागतो, कारण आमची हजार किलोमीटरची सीमा जोडली आहे. त्यामुळे एकत्र काम करावे लागते, पुढेही एकत्र काम करू. देशाच्या राजकारणातबाबत तर चर्चा होणारच होती. आज ज्या पद्धतीने देश चालला आहे, त्यात बदल झाला पाहिजे.देशात एका मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. देशातल्या युवकांना देशातला महोल नाही खराब केला पाहिजे. अशी आमची अपेक्षा आहे. इतर पार्टीच्या लोकांशीही आम्ही एकत्र काम करण्याबाबत बोलणार आहोत. महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा देशात क्रांती घडवतो. एक चांगली सुरूवात आम्ही इथून करत आहोत, असेही राव यांनी सांगितले.
ठाकरे काय म्हणाले?
मी उद्धव ठाकरे यांनाही हैदराबादमध्ये येण्यासाठी निमंत्रण देतो. यावेळी राव यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी भोजन केल्याचेही सांगितले. त्यामुळे भाजपविरोधात अनेक पक्ष एकवटत वातावरण बनवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमच्या भेटीचा प्लॅन होता, आज योगायोगाने तो दिवस उजाडला असे, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आम्ही भेटीत काही लपण्यासाठी नव्हती. ही फक्त सदिच्छ भेट नव्हती. देशातलं वातावरण गढूळ होत चाललं आहे. देशात बदल्याच्या भावनेने सुडाचं राजकारण सुरू आहे. त्यात बदल घडवण्यासाठी आम्ही भेट घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. ही सुरूवात आम्ही करत असल्याचा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.
गिरीश महाजन यांना राजकारणात मी जन्माला घातलं, मात्र बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही-एकनाथ खडसे