“मोदींनी 15 लाख बुडवले, पण काकूंनी तक्रार केली नाही, आता 1800 ची नोट काढा” व्हायरल काकूंनंतर काका जोशात
"1500 आणि 300 रुपये दिलेत, 1800 नाही दिलेत" असे ठणकावून सांगणाऱ्या काकूंचा मजेशीर व्हिडीओ काल दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
मुंबई : सोशल मीडियावर कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल, याचा नेम नाही. 1800 रुपयांच्या पगारावरुन वाद घालणाऱ्या काकू आणि तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर काकूंचे समर्थन करणाऱ्या काकांचा व्हिडीओ समोर आला आहे. (Kaku Argument on Rs 1800 not equal to 1500 and 300 Video goes Viral on Social Media)
“1500 आणि 300 रुपये दिलेत, 1800 नाही दिलेत” असे ठणकावून सांगणाऱ्या काकूंचा मजेशीर व्हिडीओ काल दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. काकूंच्या भाबडेपणाबद्दल अनेकांनी आस्था व्यक्त केली. अनेकांनी फेसबुक-इन्स्टाग्रामवर काकूंची खिंड लढवणारे स्टोरी-स्टेटसही पोस्ट केले.
दरम्यान, काकूंची वकिली करणाऱ्या एका काकांचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. “काकूंच्या कष्टाच्या पैशाच्या हिशोबात घोळ घालणाऱ्या टवाळखोर पोरांचा जाहीर निषेध” असं म्हणत काकांच्या व्हिडीओला सुरुवात होते. मागे दिसणाऱ्या औषधांच्या बाटल्या पाहता काका केमिस्ट असल्याचे वाटते.
“सत्ता बदलतील पण 1500 आणि 300 रुपये हे कधीच 1800 होऊ शकत नाहीत. काकूंची फसवणूक झाली आहे. उद्धव ठाकरे, तुमच्या राज्यात एका मराठी महिलेची लुबाडणूक होत आहे. त्या मुलांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा” अशी तिरकस मागणीही या काकांनी केली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काकूंचे 15 लाख बुडवले, पण त्यांनी त्याची कुठे तक्रार केली नाही. गेल्या सहा वर्षात इतक्या नोटा काढल्या, मग 1800 रुपयांची नोट का काढली नाही? ती भाद्रपद संपेपर्यंत आलीच पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलन करु” असा गमतीशीर इशाराच काकांनी दिला आहे.
काकू वर अन्याय झाला बघून १८०० रुपयांचा प्रश्न संसदेत मांडताना लाडके काका उद्धव ठाकरे सूनो ? हे २०२० केव्हा जातं @anil010374 @IslandGirlPRV @Liberal_India1 ? pic.twitter.com/tTWZnmfTfa
— ? गिरीश सुतार (@GirishSutar777) August 30, 2020
पाहा मूळ व्हिडीओ :
दरम्यान, या व्हायरल काकूंचा व्हिडीओ राजकीय आखाड्यात दिसला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी हा व्हिडीओ ट्विट करत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली. “निर्मला काकू अर्थतज्ञांशी जीडीपी ठरवण्याच्या पद्धतीबाबत चर्चा करताना” अशी टीका या व्हिडीओतून त्यांनी केली होती. (Kaku Argument on Rs 1800 not equal to 1500 and 300 Video goes Viral on Social Media)
निर्मला काकू, अर्थतज्ञांशी जीडीपी ठरवण्याच्या पध्दतीबाबत चर्चा करतांना…
via what’s app. pic.twitter.com/w04v8c70VB
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 30, 2020
उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काकूंना “सत्यजीतजी, परीक्षा का घेऊ नयेत हे काहींना समजून सांगता सांगता देखील अशीच काहीशी स्थिती होती !!!” असे म्हणत प्राजक्त तनपुरे यांनी केंद्रावर निशाणा साधला
सत्यजितजी, परीक्षा का घेऊ नयेत हे काहींना समजून सांगता सांगता देखील अशीच काहीशी स्थिती होती !!! https://t.co/ddEgHgQirK
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) August 30, 2020
घरकाम करणाऱ्या या काकूंचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. “हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. त्यासाठी आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी लवकरच कार्यक्रम हाती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातमी :
खदखदखद लाव्हा रस… वऱ्हाडी भाषेत ऑनलाइन क्लास, मास्तर नितेश कराळे सोशल मीडियावर लोकप्रिय
(Kaku Argument on Rs 1800 not equal to 1500 and 300 Video goes Viral on Social Media)