कल्याण-डोंबिवलीत विकास कामं रखडली, भाजप नगरसेवकांचं पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध विकास कामांसाठी भाजप नगरसेवकांनी आंदोलन सुरु केलं आहे. (Kalyan Corporator agitation for various development works)

कल्याण-डोंबिवलीत विकास कामं रखडली, भाजप नगरसेवकांचं पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 3:21 PM

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध विकास कामांसाठी भाजप नगरसेवकांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापालिका क्षेत्रातील विकास कामे होत नाही असा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. फक्त टक्केवारीसाठी काही काम थांबवले जातात. याकडे शिवसेना हेतूपुरस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसी प्रशासनावर केला. माजी राज्यमंत्री आणि डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहे. (Kalyan Corporator agitation for various development works)

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकास कामासाठी नगरसेवकांना उपोषणाचा आधार घ्यावा लागला आहे. गेल्या तीन वर्षात नगरसेवक निधीतून अपेक्षित असलेली विकास कामे कागदावरच राहिली आहेत. मागील सहा महिन्यात कोरोना उपाययोजनासाठी इतर कामे प्रशासनाकडून प्रलंबित ठेवण्यात आली आहे. अनेक नगरसेवकांच्या सर्व फाईल्स शहर अभियंता स्तरावर प्रलंबित असल्यामुळे नगरसेवक त्रस्त आहेत.

त्यातच आदेश दिलेली कामे देखील प्रशासनाने रोखली आहेत. आता विद्यमान नगरसेवकांची मुदत 11 नोव्हेंबर रोजी संपत आहे. तत्पूर्वी मागील तीन वर्षातील नगरसेवक निधीची कामे तसेच परिशिष्ट 1 मधील कार्यदेश दिलेली कामे मार्गी लावण्याच्या मागणीसाठी 12 ऑक्टोबरपासून उपोषण करणार असल्याचा इशारा विरोधी पक्ष नेता राहुल दामले यांनी दिला होता.

मात्र तरीही शहर अभियंता स्तरावरुन किंवा प्रशासनाकडून नगरसेवकांच्या शंकाचे निरसन करण्यात आलेले नाही. त्यामुळे आजपासून सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यालयात उपोषण केलं.

तर आमदार रवींद्र चव्हाण यांनी कोरोना काळात विकासकामे झाली नाही हे आम्हीही समजू. पण कोरोनाच्या आधीची मंजूर कामे देखील झालेली नाहीत. फक्त टक्केवारीसाठीच ही कामे रखडवल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला. या आंदोलनमध्ये विरोधी पक्षनेता राहुल दामले, गटनेता शैलेश धात्रक, नगरसेविका सुनिता पाटील, नगरसेवक वरून पाटील, नगरसेवक दया गायकवाड नगरसेवक, संदीप पुराणिक नगरसेवक अभिमन्यू गायकवाड नगरसेवक संदीप गायकर नगरसेविका रेखा चौधरी नगरसेविका खुशबू चौधरी यांनी सहभाग घेतला आहे. (Kalyan Corporator agitation for various development works)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रावर आसमानी संकटाची शक्यता, 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Power Cut | मुंबईतील रुग्णालयांमधील वीज पुरवठा खंडित नाही: आयुक्त चहल

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.