AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये आठवडी बाजार, हजारोंची गर्दी, आयुक्तांचा एक फोन आणि शुकशुकाट

केडीएमसी हद्दीत गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. महापालिका आयुक्तांकडून वारंवार नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे (crowd in Kalyan Market).

कल्याणमध्ये आठवडी बाजार, हजारोंची गर्दी, आयुक्तांचा एक फोन आणि शुकशुकाट
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 10:22 PM

कल्याण (ठाणे) : केडीएमसी हद्दीत गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. महापालिका आयुक्तांकडून वारंवार नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. तरीदेखील दुकानदार आणि नागरिकांमध्ये कोरोनाचे भय नाही. विशेष म्हणजे कल्याण पूर्वेत आज (19 फेब्रुवारी) आठवडा बाजार भरला तर पश्चिमेतील डी मार्टमध्ये खरेदीसाठी शेकडो लोकांची गर्दी बघायला मिळाली. याबाबत केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना माहिती मिळाली. त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना फोन करत कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर अवघ्या काही क्षणात कठोर कारवाई झाली. आठवडी बाजार परिसर शुकशुकाट झाला. त्याचबरोबर पोलिसांनी डी मार्ट विरोधात कारवाई केली (crowd in Kalyan Market).

कल्याणमध्ये कोरोनाचा कहर असताना खडेगोळवलीत आठवडा बाजार

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या दररोज वाढू लागली आहे. गेल्या काही महिन्यात प्रशासनाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. केडीएमसी हद्दीत बुधवारी 128 रुग्ण, गुरुवारी 132 तर आज 145 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा 61 हजार 548 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 1155 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आाहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक अमंलबजावणी करण्यासाठी स्वत: आयुक्त विजय सूर्यवंशी आज रस्त्यावर उतरले होते. तरीदेखील दुकानदार किंवा नागरीकांना कोरोनाचे भय नाही. कल्याण पूर्व भागात खडेगोळवली परिसरात आठवडा बाजार भरला होता. अनेक लोकांनी मास्क घातला नव्हता. या ठिकाणी केडीएमसीचे अधिकारी नेमकं काय करत आहे? असा सवाल उपस्थित होतोय.

डी मार्टवर कारवाई

दुसरीकडे कल्याण पश्चिमेत महात्मा फुले पोलिसांना डी मार्टमध्ये शेकडोंच्या संख्येने ग्राहक खरेदी करताना दिसून आले. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टसींग किंवा सॅनिटाजरची व्यवस्था नव्हती. वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी डी मार्ट व्यवस्थापना विरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

kalyan d mart

डी मार्टवर कारवाई

हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांची तोबा गर्दी

कोरोच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून सुद्धा कल्याण पश्चिमेतील महिंद्रसिंग काबुसिंग या कॉलेज परिसरात हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्याकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त माजी नगरसेविका वैशाली पाटील हे देखील बिना मास्क मंचावर बसल्या होत्या. कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात लहान मुलं देखील होते.

हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांची तोबा गर्दी

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.