AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

R R आबांच्या सख्ख्या भावाने मुश्रीफांविरोधात तक्रार स्वीकारली, सोमय्या म्हणाले, आबा यांच्यासारखे नव्हते!

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठरल्याप्रमाणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस (Murgud Police) ठाण्यात जाऊन किरीट सोमय्यांनी तक्रार दिली.

R R आबांच्या सख्ख्या भावाने मुश्रीफांविरोधात तक्रार स्वीकारली, सोमय्या म्हणाले, आबा यांच्यासारखे नव्हते!
किरीट सोमय्या यांची हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 4:15 PM

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठरल्याप्रमाणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस (Murgud Police) ठाण्यात जाऊन किरीट सोमय्यांनी तक्रार दिली. हसन मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. त्याचीच तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या मुरगूड पोलिसात गेले. यावेळी किरीट सोमय्या यांची तक्रार कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील (R R Patil) यांनी स्वीकारली.

महत्त्वाचे म्हणजे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील हे दिवंगत गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांचे सख्खे बंधू आहेत. राष्ट्रवादीचे नेते असलेले हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील तक्रार राष्ट्रवादीच्या दिवंगत नेत्याच्या पोलीस भावाकडे करण्यात आली. यावेळी पोलिस स्थानकात किरीट सोमय्या यांनी आर आर आबांच्या आठवणींना उजाळा दिला.

आर आर आबा चांगले होते, सज्जन होते, सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यासारखे नव्हते, मला बऱ्याचदा सल्ला द्यायचे आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो, असं किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षक राजाराम पाटील यांना सांगितलं.

किरीट सोमय्यांचा हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल 

घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीम यांना तुरूंगात धाडणार. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झाली आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या  (Kirit Somaiya) आज कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल (Kagal) तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये (Murgud Police station) देण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्यांचे आरोप काय? 

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आतापर्यंत दोन आरोप केले आहेत. यामध्ये पहिला आरोप म्हणजे कागलमधील सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याबाबतचा आहे. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला.  बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा पहिला आरोप सोमय्यांनी केला होता.

सोमय्यांनी दुसरा आरोपही साखर कारखान्याबाबत केला आहे.  आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यातही बेनामी कंपन्यांद्वारे पैशांची अफरातफर केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यामध्ये किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबत त्यांच्या जावयाकडे बोट दाखवलं आहे.

संबंधित बातम्या  

Kirit Somaiya vs Hasan Mushrif : आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात, अंबाबाईच्या दरबारात सोमय्यांचा एल्गार

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.