Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INS Vikrant Case : विक्रांत घोटाळ्यात नाव येताच किरीट सोमय्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण; सोमय्या नेमकं काय म्हणाले?

INS Vikrant Case : सेव्ह विक्रांत (INS Vikrant Case) मोहीम राबवताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाल्याने भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) पुरते अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे आणि कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

INS Vikrant Case :  विक्रांत घोटाळ्यात नाव येताच किरीट सोमय्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण; सोमय्या नेमकं काय म्हणाले?
विक्रांत घोटाळ्यात नाव येताच किरीट सोमय्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवणImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 4:23 PM

मुंबई: सेव्ह विक्रांत (INS Vikrant Case) मोहीम राबवताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाल्याने भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) पुरते अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे आणि कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. त्यातच सोमय्यांनी सेव्ह विक्रांतचा पैसा पक्षाला दिल्याचं कोर्टाला सांगितलं आहे. त्यामुळे तर सोमय्या प्रचंड गोत्यात आले आहेत. त्यामुळे नॉट रिचेबल असलेले सोमय्या आज अचानक एका व्हिडीओच्या माध्यमातून मीडियासमोर आले आहेत. त्यात त्यांनी आपण उच्च न्यायालयात (high court) दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, आपल्यावरचे आरोप फेटाळताना सोमय्या यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

सोमय्या नेमकं काय म्हणाले?

कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या आज पहिल्यांदाच एका व्हिडीओच्या माध्यमातून मीडियासमोर आले. या व्हिडिओत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यावेळच्या सरकारने आयएनएस विक्रांत 60 कोटीला भंगारात विकण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयाचा भाजपने निषेध नोंदवला होता. त्यामुळे 10 डिसेंबर 2013 रोजी आम्ही फक्त एक प्रतिकात्मक निधी जमवण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. या मोहिमेतून आम्ही फक्त 11 हजार रुपये जमवले होते. आज 10 वर्षानंतर सोमय्यांनी 58 कोटी रुपये जमा केले. चार बिल्डरशी मनी लॉन्ड्रिंग करून आपल्या मुलाच्या कंपनीत वळवले, असं राऊत म्हणाले. या पूर्वी राऊतांनी दोन महिन्यात सात आरोप केले. एकाचाही पुरावा दिला नाही. पोलिसांकडे एकही कागद नाही. केवळ राऊतांच्या स्टेटमेंटवरून तक्रार केल्याचं तक्रारदार म्हणतोय, असं सोमय्या म्हणाले.

आम्ही विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपतींना भेटलो होतो. राज्यपालांना भेटलो. त्यावेळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेही राष्ट्रपतींच्या भेटीसाठी आले होते. विक्रांत वाचवण्याची आम्ही राष्ट्रपतींना गळ घातली होती, असं सोमय्या म्हणाले. ठाकरे सरकारच्या घोटाळ्याबाजांना अद्दल घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. विक्रांतबाबतची सर्व माहिती उच्च न्यायालयात देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केले.

सोमय्यांना नोटीस

दरम्यान, किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांच्या घरी येऊन दारावर ही नोटीस चिटकवली आहे. तसेच या दोघांनाही उद्या 13 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सोमय्या उद्या पोलिसांसमोर हजर राहणार की कोर्टाच्या निर्णयानंतरच काही निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

Kirit somaiya : सोमय्यांना सलग दुसरा मोठा झटका, मुलाचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला

Raj Thackeray LIVE: हिंदूत्व, भोंगे ते लाव रे तो व्हिडिओ; राज ठाकरे यांची तोफ संध्याकाळी कुणावर धडाडणार?

Maharashtra News Live Update : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या, आजही कोर्टात पदरी निराशा

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.