तुमच्या पार्ट्यांचे पैसे कुणी दिले? उत्तर द्या संजय राऊत, सोमय्यांचं थेट आव्हान

कोविडची (Corona) कॉन्ट्रॅक्ट देताना राऊतांनी भ्रष्टाचार केल्याचा थेट आरोप सोमय्या करत आहे. आता राऊतांच्या मुलीच्या लग्नातील डेकोरेटर चर्चेत आलाय. माझ्या मुलीच्या लग्नातील डेकोरेटरला धमकावल्याचा आरोप राऊतांनी केल्यानंतर आता सोमय्यांनी पुन्हा काही आरोप करत राऊतांना काही सवाल केले आहेत.

तुमच्या पार्ट्यांचे पैसे कुणी दिले? उत्तर द्या संजय राऊत, सोमय्यांचं थेट आव्हान
संजय राऊतांना सोमय्यांचे पुन्हा सवाल
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 6:12 PM

रत्नागिरी : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे टार्गेट करत आहे. कोविडची (Corona) कॉन्ट्रॅक्ट देताना राऊतांनी भ्रष्टाचार केल्याचा थेट आरोप सोमय्या करत आहे. आता राऊतांच्या मुलीच्या लग्नातील डेकोरेटर चर्चेत आलाय. माझ्या मुलीच्या लग्नातील डेकोरेटरला धमकावल्याचा आरोप राऊतांनी केल्यानंतर आता सोमय्यांनी पुन्हा काही आरोप करत राऊतांना काही सवाल केले आहेत. तुमच्या मुलीच्या लग्नातील डेकोरेटची चौकशी करण्याची वेळा का येते? याचं राऊतांनी स्पष्टीकरण द्यावे. तसेच मुलीच्या लग्नाच्या ज्या मोठा, मोठ्या हॉटेलात पार्ट्या ठेवल्या. त्या पार्ट्यांची बिलं कुणी दिली? ज्यांना कोविड काळात मागच्या दाराने कॉन्ट्रॅक्ट दिली, त्यांनी ती बिलं भरली का? असा सवाल सोमय्यांनी राऊतांना विचारला आहे.

आदित्य ठाकरेंनी नाटकं बंद करावीत-सोमय्या

तसेच आदित्य ठाकरेंना सांगा नाटकं बंद करा. मुख्यमंत्र्यांनी कॉन्ट्रॅक्ट का दिलं? याचं उत्तर आदित्य ठाकरे का देत नाहीत? का त्या कंत्राटदारावर अॅक्शन घेतली जात नाही? असे सवाल करत किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. ब्लॅकलिस्ट कंपनीला काँन्ट्रॅक्ट मिळालीच कशी? सोमय्या यांनी कालच जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्यावरून ठाकरे सरकारला घेरलं होतं. सुजित पाटकर आणि राजीव साळूंखेंचे काय संबंध आहेत हे संजय राऊतांच्या मुलींना सांगू द्या. संयुक्तपणे जमिनी खरेदी केल्या आहेत. राजीव साळुंखेंचं वार्षिक उत्पन्न 70 हजार आहे आणि त्यांना 100 कोटींचं टेंडर मिळालं. कोव्हिड घोटाळ्यांना आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सुजित पाटकर जबाबदार आहेत. ही कंपनी केव्हा तयार झाली, उलाढाल किती, स्टाफ किती, खोटे पुरावे सादर करून राज्यात लोकांची हत्या केली, अशी टीकाही त्यांनी केली होती.

अनिल परबांविरोधात सोमय्या आक्रमक

किरीट सोमय्या यांनी अनिल परबांचा रिसॉर्ट तोडलाचं पाहिजे, असं म्हटलंय. त्यासाठी जिल्हाधिकारी , जिल्हा अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे. अनिल परब गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. केंद्र सरकारने आदेश दिलेत तोडक कारवाई कधी करणार? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात फायनल ऑर्डर आता आली आहे.ठाकरे सरकार का कारवाई करत नाही?, असा सवाल त्यांनी केलाय. रिसॉर्ट बांधणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचं सोमय्या म्हणाले.

शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना 1 वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटीचा दंड! नेमकं प्रकरण काय?

“कुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही”, मलिकांचं विधान, राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट विरोध?

कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा, अनिल परबांना तुरुंगात जावंच लागेल; किरीट सोमय्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.