घरेलू कामगारांपासून ते रिक्षा चालकांपर्यंत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बघा कुणाला किती पैसा मिळणार?

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गरजु आणि वंचितांना आर्थिक मदत करण्याची मोठी घोषणा केली. या घोषणांचा हा आढावा.

घरेलू कामगारांपासून ते रिक्षा चालकांपर्यंत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बघा कुणाला किती पैसा मिळणार?
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 9:34 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना राज्यातील कोरोनाची माहिती देताना उपाययोजनांचेही तपशील सांगितले. तसेच बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गरजु आणि वंचितांना आर्थिक मदत करण्याची मोठी घोषणा केली. या घोषणांचा हा आढावा (Know all about financial package to citizens of Maharashtra amid Corona Lockdown).

1. राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देणार आहोत. या योजनेमध्ये सात कोटी नागरिकांचा समावेश आहे. दहा रुपयांची शिवभोजन थाळी पाच रुपयांवर आणली होती. पुढचे काही दिवस शिवभोजन थाळी मोफत देणार आहोत.

2. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना अशा पाच योजनेतील लाभार्थ्यांना 1 हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये 35 लाख लोकांचा समावेश आहे.

3. महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ आहे. त्यात 12 लाख लाभार्थी आहेत. त्यांना 1500 रुपये देणार आहोत.

4. नोंदणीकृत घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत करणार.

5. अधिकृत फेरीवाले यांना प्रत्येकी 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 5 लाख आहे.

6. रिक्षा चालकांना 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 15 लाख आहे.

7. आदिवासी समाजातील खावटी योजनेच्या लाभार्थी आदिवासी कुटुंबाना प्रत्येकी 2000 रुपये देत आहोत. त्यांची संख्या 12 लाख आहे.

8. कोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी 3300 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत.

9. हे सगळ करण्यासाठी 5 हजार 400 कोटी रुपये निधी बाजूला काढून ठेवत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

1. 100 टक्के ऑक्सिजनचा उपयोग वैद्यकीय कारणांसाठी होणार. सध्या महाराष्ट्रात 950-1000 टन ऑक्सिजनचं उत्पन्न होतं.

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील इतर राज्यांमधूनही ऑक्सिजन आणण्याची परवानगी दिली. रस्त्याने ऑक्सिजन आणताना लष्कराच्या, वायू दलाच्या मदतीने हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी द्यावी आणि व्यवस्था करावी अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार आहे.

3. मार्चमध्ये जीएसटीची मर्यादा असते ती आणखी 3 महिन्यांनी वाढवण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार. उद्योगधंदे राहिले पाहिजे, तरच रोजीरोटी राहिल.

4. या काळात रोजीरोटी गेली त्यांना व्यक्तिगत मदत करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार.

5. रेमडेसिव्हिर इंजेक्शन कमी पडू देणार नाही.

6. रुग्णवाढ भयावह आहे. ऑक्सिजनचा खूप उपयोग करावा लागतोय कारण रुग्ण वाढलेत. त्यामुळे ऑक्सिजन तुटवडा होतोय.

7. नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना उपचाराच्या कामात सहभागी होण्याचं आवाहन. निवृत्त डॉक्टरांनीही या लढाईत सहभागी व्हावं.

8. एकदम लॉकडाऊन लावणार नाही, पण त्यासारखे काही निर्बंध लावावे लागतील. बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार. याला केवळ पंढरपूर-मंगळवेढा काही दिवसांसाठी अपवाद असेल.

9. 14 एप्रिल सायंकाळपासून राज्यभरात ब्रेक द चेन अंतर्गत कलम 144 लागू करत संचारबंदी होणार. अनावश्यक प्रवास बंद करावा लागणार. योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

10. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा चालू असतील. लोकल आणि बससेवा बंद करणार नाही. जीवनावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी व्यवस्था ठेवणार.

हेही वाचा :

Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown Highlights : राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी

राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra lockdown Update : उद्यापासून 15 दिवस महाराष्ट्रात संचारबंदी, काय सुरु, काय बंद राहणार?

व्हिडीओ पाहा :

Know all about financial package to citizens of Maharashtra amid Corona Lockdown

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...