AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिपळूणमध्ये मृत्यूचं तांडव का? ‘ही’ आहेत 5 कारणं

चिपळूणमध्ये निसर्गाचं रौद्ररुप पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक लोक बेघर झाले. यामुळे अनेक नागरिकांचे हाल झाले. चिपळूणमधील हा हाहाकार पाहून अनेकांना असं का घडलं असावं असा प्रश्न पडला.

चिपळूणमध्ये मृत्यूचं तांडव का? 'ही' आहेत 5 कारणं
चिपळूणमधील पुराची संग्रहित दृश्यं
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 3:55 AM

रत्नागिरी : चिपळूणमध्ये एकीकडे निसर्गाचं रौद्ररुप पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक लोक बेघर झाले. मात्र, दुसरीकडे सरकारी यंत्रणांकडून मदतकार्यातही संथपणा जाणवला. यामुळे अनेक नागरिकांचे हाल झाले. चिपळूणमधील हा हाहाकार पाहून अनेकांना असं का घडलं असावं असा प्रश्न पडला. साऊथ आशिया नेटवर्क ऑन डॅम, रिव्हर अँड पीपल या संस्थेच्या सहाय्यक समन्वयक आणि नद्यांच्या अभ्यासक परिणीती दांडेकर यांनी देखील या सर्व परिस्थितीवर आपली निरिक्षणं नोंदवली आहेत. याच प्रश्नाची उत्तरं शोधणारा हा खास रिपोर्ट.

जाणकारांच्या मते चिपळूणमध्ये तयार झालेल्या परिस्थितीमागील 5 प्रमुख कारणं

1. सामान्य पर्जन्याच्या दीडपट पाऊस

चिपळूणमध्ये 22 जुलैपर्यंत 2436.9 मिमी पाऊस झालेला आहे. हा पाऊस अख्ख्या मॉन्सूनच्या 71 टक्के आणि सामान्य पर्जन्याच्या 141.7 टक्के आहे. म्हणजेच यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा थोडा कमी पाऊस आहे.

2. कोयना जलविद्युत प्रकल्पाचे अवजल देशावरून वळवून वाशिष्ठी नदीत सोडणे

या भागात एकीकडे सर्वसामान्य पर्जन्यमानापेक्षा खूप जास्त पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत कोयना जलविद्युत प्रकल्पाचे अवजल देशावरून वळवून वाशिष्ठी नदीत सोडल्यानं पुराला आमंत्रण देणं आहे. पावसाच्या या परिस्थितीत देशावरच्या पाण्याने कोकणातल्या पुरात भर पडलीय.

3. कोयना प्रकल्पाच्या एकूण क्षमतेपेक्षा खूप कमी उपयोग

आत्ता कोयना टप्पा 3 कार्यरत आहे आणि साधारणपणे 265 MW क्षमतेने उत्पादन करत आहे. कोयना प्रकल्पाची एकूण क्षमता बघता हे कमीच आहे. किमान या स्थितीत कोयनेतून येणारे अवजल कमी राहील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मात्र तसं झालेलं दिसत नाही.

4. वशिष्ठी नदीतील विक्रमी पाणी पातळी

वाशिष्ठी नदीने मुरादपूर येथील फ्लड फोरकास्टिंग स्टेशन (Muradpur flood forecasting station) येथे पूर्वी कधीही रेकॉर्ड न केलेल्या पातळीची नोंद 22 जुलै रोजी झालीय.

5. जागतिक तापमान वाढ आणि धरण व्यवस्थापन, अतिक्रमण, अनास्था

जागतिक तापमान वाढीकडे आवश्यक लक्ष दिलं जात नसल्यानं निसर्गाचं संतुलन बिघडत आहे. यामुळे ऋतुचक्र बदललं असून पावसाच्या पॅटर्नमध्ये मोठे बदल झालेत. याशिवाय एकीकडे जागतिक तापमान वाढीकडे लक्ष देत असतानाच दुसरीकडे यामुळे उद्भवणारे धोके पाहून त्यावरील उपाययोजनाही तयार ठेवायला हव्यात. मात्र, तशी तयारी झालेली दिसत नाही. त्यामुळे या संकटात अनेकांना आपली जीव गमवावा लागला.

पर्यावरण तज्ज्ञ आणि नदी व धरणांच्या अभ्यासक परिणीती दांडेकर म्हणाल्या, “चिपळूणमध्ये 22 जुलैपर्यंत 2436.9 मिमी पाऊस झालेला आहे. हा पाऊस अख्ख्या मॉन्सूनच्या 71 टक्के आणि सामान्य पर्जन्याच्या 141.7 टक्के आहे. म्हणजेच यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा थोडा कमी पाऊस आहे. अशा परिस्थितीत कोयना जलविद्युत प्रकल्पाचे अवजल देशावरून वळवून वाशिष्ठी नदीत सोडणे म्हणजे पुराचे परिणाम अजून गंभीर करणे आहे.”

“आत्ता कोयना टप्पा 3 कार्यरत आहे आणि साधारणपणे 265 MW क्षमतेने उत्पादन करत आहे. कोयना प्रकल्पाची एकूण क्षमता बघता हे कमीच आहे. किमान या स्थितीत कोयनेतून येणारे अवजल कमी राहील आणि निदान पावसाच्या या परिस्थितीत देशावरच्या पाण्याने कोकणातल्या पुरात भर पडणार नाही, अशी आशा आहे. वाशिष्ठी नदीने मुरादपूर येथील फ्लड फोरकास्टिंग स्टेशन (Muradpur flood forecasting station) येथे पूर्वी कधीही रेकॉर्ड न केलेल्या पातळीची नोंद 22 जुलै रोजी झालीय,” असं परिणीती दांडेकर यांनी सांगितलं.

“नद्यांनी सतत उच्चांकी पातळी गाठणं (highest recorded level of river) याला जागतिक तापमान वाढ म्हणजेच क्लायमेट चेंज फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. त्यानंतर धरण व्यवस्थापन, अतिक्रमण, अनास्था अशी कारण येतात,” असंही दांडेकर यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

Pune Rain : पुणे जिल्ह्यातही पुराचं थैमान, 420 गावं बाधित, दोघांचा मृत्यू, 700 जणांचं स्थलांतर

VIDEO: साताऱ्यात कृष्णेचं पाणी थेट स्मशानभूमीत, मृतदेह निम्मी अर्धी जळालेल्या स्थितीत पाहून कर्मचाऱ्यांची धांदल

केंद्राकडून महाराष्ट्राला मदत, एनडीआरएफची 26 पथकं, हवाईदलाचे 4 हेलिकॉप्टर्ससह लष्करही दाखल

व्हिडीओ पाहा :

Know why Chiplun incident happen 5 big reasons behind it

'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.