Kokan Rain Update | पावसामुळे कोकणात पूरस्थिती, रायगड, रत्नागिरी, चिपळूनमध्ये काय स्थिती आहे? जाणून घ्या
Kokan Rain Update | कोकणात जोरदार पाऊस कोसळतोय. पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहतायत. अनेक भागात पूर सदुश्य स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
रत्नागिरी : सध्या कोकण पट्टयात मुसळधार पाऊस सुरु आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, परिणामी पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहतायत. त्यामुळे पूर सदुश्य स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर आहे. सलग दुसऱ्यादिवशी वारे 50 ते 55 किमी वेगाने वाहतय. बंगालच्या उपसागरात दाब निर्माण झालाय. त्यामुळे पश्चिम किनारकपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे.
रत्नागिरीत पुढचे चार दिवस कशी असेल स्थिती?
आजपासून पुढेच चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. किनारपट्टीवरील नागरिकांना अलर्ट करण्यात आलय. एकंदरीत पावसाचे जोर वाढलेला आहे. पुढचे चार दिवस अशाच पद्धतीने पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगडमध्ये काय स्थिती?
रायगडमध्ये अंबा नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. पाणी रस्त्यावर आलं आहे. त्यामुळे पाली-खोपोली मार्ग बंद झालाय. नदीकाठच्या गावांना सर्तकेतेचा इशारा देण्यात आलाय. 24 तासापासून मुसळधार पावसाने झोपडून काढलय.
चिपळूनमध्ये काय आहे स्थिती?
चिपळून शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. वशिष्ठ नदीला पूर आलाय. चिपळून शहरात सखल भागात पाणी साचलय. रात्री एनडीआरएफच पथक दाखल झालय. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिलाय. शिव नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. पु़ढचे तीन ते चार दिवस अशी स्थिती राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.