Kolhapur North By Election 2022 : कोल्हापुरात जिंकतायत मविआच्या जयश्री जाधव पण चर्चाय ती एकाच नेत्याची, सतेज पाटलांनी कशी फिल्डींग लावली?

कोल्हापूर जिल्ह्यात केडीसीची निवडणूक असो किंवा गोकुळ दूध संघाची त्यामध्ये बंटी पाटलांनी लक्ष दिले की, ती निवडणूक बंटी पाटील आपल्याच खिशात घालणार हे नक्की असते. याही निवडणुकीत तेच झालं. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक चर्चेत राहिली आहे ती बंटी पाटील यांच्या नावामुळेच

Kolhapur North By Election 2022 : कोल्हापुरात जिंकतायत मविआच्या जयश्री जाधव पण चर्चाय ती एकाच नेत्याची, सतेज पाटलांनी कशी फिल्डींग लावली?
कोल्हापूर पोटनिवडणुकीत बंटी पाटलांची हवाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 4:21 PM

कोल्हापूरः जयश्री जाधव (Jayshri Jadhav) यांची कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांच्या लढतीसाठी खरी फिल्डींग लावली सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी. बंटी पाटील यांना कोल्हापुरातल्या राजकारणाची नस सापडल्याचे मत राजकीय विश्लषक करतात ते याच कारणामुळे. कोल्हापूर जिल्ह्यात केडीसीची निवडणूक असो किंवा गोकुळ दूध संघाची त्यामध्ये बंटी पाटलांनी लक्ष दिले की, ती निवडणूक बंटी पाटील आपल्याच खिशात घालणार हे नक्की असते. याही निवडणुकीत तेच झालं. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक (Kolhapur by Election) चर्चेत राहिली आहे ती बंटी पाटील यांच्या नावामुळेच.

चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार राजेश क्षीरसागरांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यावर तोडगा काढत जयश्री जाधवांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली. त्यानंतर चालू झाला खरा प्रचार. या प्रचारात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र होतं, मात्र प्रतिष्ठेची लढत केली ती चंद्रकांत पाटील यांनी.

चंद्रकांतदादांची ईडीची भीती

या प्रचारादरम्यान भाजपनंही आपले सगळे डाव वापरून बघितले. अगदी ईडीच्यी भीतीही घातली गेली. मात्र ठोश्यास ठोसा या उक्तीप्रमाणे बंटी पाटील यांनीही कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आणि कुस्तीचा फड जिंकावा तसे त्यांनी कोल्हापुरचे राजकीय मैदान मारलेही. त्यामुळेच कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव विजयी झाल्या असल्या तरी खरी चर्चा सुरु झाली आहे ती, बंटी पाटील यांचीच.

तुम्हाला मी हिशोब देतो

भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जेव्हा काँग्रेसच्या सत्तर वर्षाचा हिशोब सतेज पाटील यांच्याकडे मागितला त्याच वेळी कोल्हापूरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले, मात्र त्यानंतर थोडाही वेळ न दवडता बंटी यांनी पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचे आव्हान स्वीकारत बिंदू चौकात येऊन मी सत्तर वर्षाचा हिशोब देतो म्हणत, तुम्ही सात वर्षाचा हिशोब द्या अशी भूमिका घेतल्यानंतरही कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत खरी रंगत आली.

आई बंटी पाटील आलाय

मागील एका निवडणुकी दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये लहान पोरगं आई म्हणतं आई बंटी पाटील आलाय हे कोल्हापूरकरांना इतकं अपिल झालं आहे की, कालच्या निवडणुकीतही येणार तर बंटी पाटील हेच चर्चेत होतं.

चर्चा बंटीच्या राजकारणाची

कोल्हापुरची पोटनिवडणूक खरी चर्चेत आली ती सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे त्यामुळे जयश्री पाटील या उमेदवार म्हणून निवडून आल्या खऱ्या मात्र आता चर्चा सुरु झाली आहे ती, बंटी पाटील यांचीच.

संबंधित बातम्या

Kolhapur North By Poll Election 2022 : त्यांचे भोंगे उतरवण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलं, संजय राऊत म्हणतात, हे तर महाराष्ट्राचं जनमत!

VIDEO : Kolhapur Election Result 2022 | कोल्हापुरात मविआचा दणदणीत विजय

By Election Results 2022 : 5 जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपला झटका, बंगालमध्ये टीएमसीची जादू, ममतांचं अभिनंदन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.