Kolhapur Corona Death | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयातून पळाला, रिक्षाने प्रवास करत घरी, उपचारादरम्यान मृत्यू

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातून घरी पळून आलेल्या 55 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला (Kolhapur Corona Patient Died) आहे.

Kolhapur Corona Death | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयातून पळाला, रिक्षाने प्रवास करत घरी, उपचारादरम्यान मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 7:29 PM

कोल्हापूर : कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातून घरी पळून आलेल्या 55 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यंत्रमाग कामगार असलेल्या या व्यक्तीच्या मृत्यूने कोल्हापुरातील कोरोना बळींची संख्या 12 झाली आहे. हा रुग्ण 24 जूनला सीपीआरमधून पळाला होता. मात्र आरोग्य यंत्रणांनी त्याला ताब्यात घेऊन पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. (Kolhapur Corona Patient Ran away from died from Hospital)

इचलकरंजीतील 55 वर्षीय यंत्रमाग कामगाराला 22 जूनला सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्यानंतर 23 जूनला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर 24 जूनला या रुग्णांने सीपीआरमधील डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पळ काढला. रुग्णालयातून पळ काढल्यानंतर त्याने महाराणा प्रताप चौकातून एका रिक्षाने त्याने थेट इचलकरंजीतील कुडचे मळ्यातील घर गाठले.

हा पॉझिटिव्ह रुग्ण सीपीआरमधून पळाल्याचे लक्षात येताच आरोग्य यंत्रणांनी पोलिसांच्या मदतीने त्याला पकडून पुन्हा उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान प्रकृती अधिकच बिघडल्याने आज (1 जुलै) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

इचलकरंजीतील हा कोरोनाचा तिसरा बळी आहे. तर जिल्ह्यात कोरोनाचा बारावा बळी गेला आहे. या घटनेमुळे इचलकरंजीसह परिसरात शोककळा पसरली. तर आधीच घाबरून गेलेल्या सर्वांची धाकधूक पुन्हा वाढली.

कोल्हापुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र परिसरातील नागरिकांनी म्हणावी तशी खबरदारी अजूनही घेतलेली दिसत नाही. यामुळे समूह संसर्गाची शक्यता बळावत आहे. इचलकरंजीतील रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची साखळी सुरुच आहे. तर ही साखळी थांबवण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र तरीही नागरिकांतून माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्यामुळे कोरोना रुग्णांची साखळी रोखण्यात प्रशासनाला अडचणी निर्माण होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 841 वर गेली आहे. यातील 720 रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 110 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली. (Kolhapur Corona Patient Ran away from died from Hospital)

संबंधित बातम्या : 

Wardha Corona | कोरोनाचा संशय, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार, 3 तास मृतदेह पडून, प्रशासनाकडून अंत्यसंस्कार

Lockdown Extension | ठाणे, कल्याण-डोंबिवलीत 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.