कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर; शाळांना सुट्टी जाहीर, अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला

Kolhapur Flood News : राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले; 5712 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु, कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर...

कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर; शाळांना सुट्टी जाहीर, अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 11:32 AM

कोल्हापूर | 26 जुलै 2023 : कोल्हापूर… पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं शहर… पण आता याच शहराला आता महापुराचा वेढा पडण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस होतोय. अशात आता कोल्हापुरात महापूर येण्याची शक्यता आहे. कारण पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने आधी इशारा पातळी ओलांडली आहे. अशातच आता राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत.

शाळांना सुट्टी जाहीर

कोल्हापूर शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. संभाव्य पूरपरिस्थितीनंतर जिल्हाप्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या आज आणि उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे. आज आणि उद्या कोल्हापूर सांगलीसह सातारा जिल्ह्याला हवामान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 28 जुलैपासून परीक्षा पूर्ववत होणार आहेत.

जरा दिलासा, मोठी धाकधूक

कोल्हापूर शहराबरोबरच धरण क्षेत्रातही पावसाने काहीशी उसंत घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी एक इंचाने कमी झाली आहे. सध्या पंचगंगेची पाणीपातळी 40 फूट 5 इंचांवर आहे. पाणी पातळी कालपासून स्थिर असल्याने नदीकाठच्या गावातील लोकांना काहीसा दिलासा आहे. मात्र आता पावसाने जोर धरला तर कोल्हापूरला महापुराचा धोका आहे.

कोल्हापुरातील राधानगरी धरण 100% भरलं आहे. धरणाचा एक स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरु आहे. सहा नंबरचा स्वयंचलित दरवाजा काही वेळापूर्वी खुला झाला आहे. राधानगरी धरणाच्या एका संचलित दरवाजातून आता भोगावती नदीत विसर्ग सुरू झाला आहे. राधानगरी धरणाचे आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. आता राधानगरी धरणाच्या 4 स्वयंचलित दरवाजामधून 5712 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणावरील तीन,चार, पाच आणि सहा नंबरचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आला आहे.

कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून 30 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने कोल्हापूर सह सांगलीला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.