Kolhapur | पहाटेचं सरकार गेल्यामुळे भाजपाचा थयथयाट, सत्तेसाठी देशात हिटरशाही, कोल्हापुरात नाना पटोलेंचा हल्लाबोल

केंद्रातील सरकार देश हितासाठी काहीच काम करत नाही. त्यामुळे 2024 मध्ये राज्यात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असेल. येत्या काळात भाजपाला या प्रकारांचे परिणाम दिसून येतील, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

Kolhapur | पहाटेचं सरकार गेल्यामुळे भाजपाचा थयथयाट, सत्तेसाठी देशात हिटरशाही, कोल्हापुरात नाना पटोलेंचा हल्लाबोल
नान पटोले यंची भाजपवर टीका Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 11:46 AM

कोल्हापूर | महाराष्ट्रात पहाटेचं सरकार गेल्यामुळे भाजपाचा थयथयाट झाला आहे. दीड दिवसांचे गणपती असतात तसेच ते विसर्जित झाले. पण केंद्रातील भाजप सरकार मदतीने राज्यातील नेत्यांना त्रास देण्याचे प्रकार भाजपने सुरु केले आहेत. राज्यातले भाजपचे नेते कायद्याची ऐशी तैशी, विचारांची ऐशी तैशी करायला निघालेत असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. कोल्हापूरमध्ये (Kolhapur Election) ते बोलत होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेची लढाई होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्य नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांनी कोल्हापूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

‘भाजप खालच्या स्तरावर जाऊन धर्माचा वापर करतेय’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना म्हटले की, भाजपच्या कालच्या सभेतून त्यांचा हिंदूंचा अजेंडा सेट केला. निवडणुका आल्या की यांना हिंदुत्व आठवतं. मूठभर लोकांसाठीच केंद्रातील सरकार काम करते. यांच्या सभांसाठी बाहेरची लोकं आणावी लागली. पण कोल्हापूरमधील जनताच यांना धडा शिकवेल. धर्माच्या आणि देवाच्या नावाने आघाडी काम करत नाही. राजीव गांधी यंनी रम लल्लंची स्थापना केली. पण काँग्रेसने कधीही धर्माचा वापर केला नाही. भाजप अतिशय खालच्या स्तरावर जाऊन धर्माचा वापर करतेय. राजकारणात देवाचा वापर करणे योग्य नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं.

‘केंद्र सरकरमुळे देशावर वीज संकट’

सध्या महाराष्ट्रात तसेच अवघ्या देशावर वीज संकट घोंगावत आहे. यासाठी केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले, ‘ केंद्र सरकारच्या राजकारणामुळे देशावर वीजेचे संकट ओढवले आहे. राज्यातील वीजेच्या संकटाला केंद्र सरकार जबाबदार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवण्यातही भाजपाचा हात आहे. भाजपाचं पहाटेचं सरकार गेल्यमुळे हा गोरखधंडा सुरु आहे. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागचा बोलविता धनी कोण आहे, हे लवकरच समोर येईल. आम्ही विकासापासून दूर नाही, तर भाजप विकासापासून दूर आहे. सत्तेचा माज व सत्तेची नशा भाजपला आहे. जे त्यांच्याविरोधात बोलतात त्यांच्यामागे ईडी लावतात. देशात एकप्रकारे आणीबणी असल्याचा हा प्रकार आहे. देशात हिटलरशाही, हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

56 इंचवाले देश विकत आहेत..

केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना नाना पटोले म्हणाले, ‘केंद्र सरकारला देशाला बुडवायचे आहे. पण केंद्रातील भाजपाला फक्त काँग्रेसच विरोध करू शकते. नेहरुंवर टीका करता आणि त्यांनीच बनवलेले आज हे लोक विकत आहेत. 56 इंचवाले देश विकत आहेत. केंद्रातील सरकार देश हितासाठी काहीच काम करत नाही. त्यामुळे 2024 मध्ये राज्यात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असेल. येत्या काळात भाजपाला या प्रकारांचे परिणाम दिसून येतील, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

इतर बातम्या-

Pune local : पुणे ते लोणावळा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; धावणार तीन अतिरिक्त लोकल, वाचा सविस्तर

Health Care : जमिनीवर झोपणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, या आरोग्य समस्या होतील दूर!

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.