पानटपरी बंद करून चालला होता घरी; दोघं आले अन् सरळ सपासप…

ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरताच तेजस डोंगरे यांचे कुटुंबीय, मित्र परिवाराने रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती.

पानटपरी बंद करून चालला होता घरी; दोघं आले अन् सरळ सपासप...
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 12:23 AM

इचलकरंजी/कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. वेगवेगळ्या कारणांनी इचलकरंजी शहर चर्चेत येत आहे. त्यातच आज मंगळवारी रात्री एका युवकाचा दोन तीन जणांनी धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडल्याने इचलकरंजी शहर हादरले आहे. मात्र या मागचे नेमके कारण समजू शकले नाही. ज्या युवकाची हत्या झाली आहे. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

इचलकरंजी शहरातील यड्राव फाटा येथे तेजस डोंगरे या पानपट्टी चालकाचा धारधार शस्त्राने हत्त्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

तेजस डोंगरे हा रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपली पानपट्टी बंद करून बाहेर थांबले होते. यावेळी अज्ञात दोन ते तीन जणांनी त्याच्यावर वार करून त्याला जखमी केले होते. त्यानंतर जवळच असलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरताच तेजस डोंगरे यांचे कुटुंबीय, मित्र परिवाराने रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती.

ज्या ठिकाणी घटना घडली त्याठिकाणी शहापूर पोलिसांनी पाहणी करून आरोपींना पकडण्यासाठी 2 पथके रवाना करण्यात आली आहेत. तेजस डोंगरे यांच्या मित्रमंडळीकडून हल्लेखोऱ्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित पाटील हे करत आहेत.

या प्रकरणचा तपास करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली असून या हत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.  मात्र परिसरात तणाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.