Kolhapur North Assembly by Election: कोल्हापुरात 60.9 टक्के मतदान; बंटी-दादांची प्रतिष्ठा पणाला; सगळ्यात जास्त मतदान पुरुषांचे

मतदान केंद्राचे प्रवेशद्वार उघडण्यावरुन कमला कॉलेज परिसरात तर भगव्या रंगाचे छत असलेले बूथ काढण्यावरून कॉमर्स कॉलेज परिसरात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले. राजारामपुरीच्या तुलनेत शाहुपुरी, मंगळवारपेठेत मतदानाची प्रक्रिया अधिक गतीने सुरू होती.

Kolhapur North Assembly by Election: कोल्हापुरात 60.9 टक्के मतदान; बंटी-दादांची प्रतिष्ठा पणाला; सगळ्यात जास्त मतदान पुरुषांचे
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी चुरशीने मतदानImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 9:25 PM

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक (Kolhapur North Assembly by Election) आता महाराष्ट्रातल्या दिग्गज पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60.9 टक्के मतदान झाले. कोल्हापुरमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप अशी लढत दिसत होती. या निवडणुकीतील उमेदवारांसाठी काँग्रेससह शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या बड्या बड्या नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. त्यामुळे कोल्हापुरात काँग्रस उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshri Jadhav) आणि भाजपचे उमेदवार सत्यजित कदम (Satyajit Kadam) यांच्यासाठी चुरस दिसून आली. त्यामुळे सगळ्याच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी60.9 टक्के मतदान झाले. त्यामध्ये एकूण 1 लाख 61 हजार 289 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 84 हजार 566 पुरुष तर, 76 हजार 721 महिला मतदारांनी मतदान केले.

सायंकाळपर्यंत 55.27 टक्के मतदान

मतदानादिवशी कोल्हापुरातील सगळे नेते बूथवर थांबून मतदारांना सांगण्यात येत होते. आज भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री सतेज पाटील, जयश्री जाधव, सत्यजित कदम हे सगळेच नेते आपापल्या उमेदवारासाठी प्रयत्न करताना दिसून आले. सायंकाळपर्यंत 55.27 टक्के मतदान झाले, मात्र काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले होते.

पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद

मतदान केंद्राचे प्रवेशद्वार उघडण्यावरुन कमला कॉलेज परिसरात तर भगव्या रंगाचे छत असलेले बूथ काढण्यावरून कॉमर्स कॉलेज परिसरात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले. राजारामपुरीच्या तुलनेत शाहुपुरी, मंगळवारपेठेत मतदानाची प्रक्रिया अधिक गतीने सुरू होती. केंद्रामध्ये गेल्यानंतर एका मतदाराला मतदान करण्यासाठी दोन-तीन मिनिटे लागत होती. अशा किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले असले तरी एकंदरीत कोल्हापूर पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले आहे.

पुरुष मतदारांची अधिक संख्या

या मतदानासाठी दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील विविध परिसरातील मतदान केंद्रांवर महाविकास आघाडी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूथ लावले होते तर मतदान कक्ष, यादीतील क्रमांक सांगण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत होते. दरम्यान, सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत एकूण 20.57 टक्के मतदान झाले. मतदानाची एकूण संख्या 60018 इतकी होती. त्यात 34589 पुरूष, तर 25429 महिला मतदारांचा समावेश होता.

भाजपची जय श्रीराम तर महाविकासची जय भवानी, जय शिवाजी

कोल्हापुरात मतदान होत असताना शिवाजी पेठेतील 8 नंबर शाळेजवळ भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या निवडणुकीत भाजपने जय श्रीराम तर महाविकास आघाडीकडून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात येत होत्या. या घोषणांमुळे परिसरातील वातावरण तंग बनले होते.

मनःपूर्वक आभार;चंद्रकांत पाटील

कोल्हापूर पोटनिवडणुकीचे सहा वाजता मतदान संपल्यानंतर भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरुन मतदारांचे मनपूर्वक आभार मानले. आभार मानताना त्यांनी, आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या लोकशाहीच्या उत्सवात उत्फुर्तपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावणाऱ्या सर्व मायबाप जनतेचे मनःपूर्वक आभार अशी पोस्ट त्यांनी ट्विटरवरुन केली आहे.

संबंधित बातम्या

ST Workers Strike : एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून पडळकर, खोतांचा हिस्सा किती? अतुल लोंढेंचा सवाल

INS Vikrant Case : भाजपाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदाराची चौकशी करा; नाना पटोले यांची मागणी

Raghunath Kuchik : चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती खोटी, पीडितेचे पुन्हा गंभीर आरोप

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.