पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, कोकणात मुसळधार, तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय?

येत्या दोन दिवस हवामान खात्याने मुसळधारपावसाचा (Maharashtra rain) इशारा दिल्याने मुंबईसह राज्यातील (Mumbai rain) प्रत्येकाची धाकधूक थोडी वाढली आहे. 

पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, कोकणात मुसळधार, तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय?
Follow us
| Updated on: Sep 05, 2019 | 10:04 AM

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुंबई, पुणे, कोकण, कोल्हापूर यासह इतर ठिकाणी पावसाने (Heavy rain) जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती (Maharashtra rain) निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर येत्या दोन दिवस हवामान खात्याने मुसळधार पावसाचा (Maharashtra rain) इशारा दिल्याने मुंबईसह राज्यातील (Mumbai rain) प्रत्येकाची धाकधूक थोडी वाढली आहे.

मुंबई : 

सलग दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर (Mumbai Rains) मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचं पाणी साचल्यामुळे विस्कळीत झालेली मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर आली आहे. मात्र पुढील 48 तास मुंबईकरांसाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोल्हापूर

कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत पंचगंगेची पाणीपातळी 26 फुटांवर गेली आहे. याशिवाय राधानगरी धरणाच्या चार दरवाजातून काल रात्रीपासून विसर्ग अद्याप सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील 18 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली (Maharashtra flood) गेलेत.

रत्नागिरी

सलग पाचव्या दिवशी कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने अद्याप उसंत घेतलेली नाही, त्यामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. दरम्यान रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहेत. मात्र कोकणात जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. मुर खिंडीत पडलेली दरड न हटवल्याने एकेरी वाहतुक सुरु आहे. हवामान विभागाने येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने मासेमारी पुर्णपणे ठप्प झाली आहे.

रायगड

रोहा ते नागोठणेदरम्यान खारपाटी येथे पडलेली दरड हटवल्याने कोकण रेल्वे सुरु झाली आहे. तर ताम्हाणी घाटात काल दरड कोसळल्याने रस्ते वाहतूक बंद केली होती, मात्र ती दरडही हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच अलिबाग ते नागोठणे – रोहा दरम्यान भिसे खिडींतील दरड हटवून वाहतूक सुरळीत सुरु आहे. त्याशिवाय अलिबाग – रोहा मार्गावरील रामराज येथील दरड हटवून वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

कोकण

कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असला, तरी सावित्री व पाताळगंगा नदीची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. तर आबां व कुडंलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. चारही प्रमुख नद्या धोका पातळीपेक्षा कमी प्रमाणात वाहत आहे.

शहापूर

गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने भातसा धरणाच्या पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे 0.25 मीटर ने उघडण्यात आले असून धरणातून सुमारे 135.43 क्युसेक्स ( घनमीटर प्रति सेकंद) पाण्याचा विसर्ग होत आहे.

त्यामुळे शहापूर – मुरबाड रस्त्यावरील सापगाव भातसा नदीवरील पुलावरून वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अमरावती

अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा 85 टक्क्यांवर कधीही उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागपूर

नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. तोतलाडोह धरणाचा पाणीसाठी 43.13 टक्केपर्यंत झाल्याने नागपूरकरांवरील पाणी कपातीच संकट होणार दूर होणार आहे. मध्यप्रदेशाच्या चौराई दरवाजे उघडल्याने पाणीसाठा वाढला आहे.

कराड 

कोयना धरणाचे दरवाजे 10 फुटांवर उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रात 87 हजार 338 क्यूस्के वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर धरणात पाण्याची आवक 67 हजार 277 क्यूसेक वेगाने होत आहे. पहाटे 6 पर्यंत कोयना पाणलोट क्षेत्रात 138 मिमी, नवजा 232 मिमी, महाबळेश्वर 136 मिमी, वळवण 187 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.