सराईत गुन्हेगार जेलच्या कोव्हिड सेंटरचे गज कापून पळाले, ऊसाच्या शेतात दोन दिवस तळ, सापडले कसे?

कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्यामुळे हे दोघे करवीर, कागल, भुदरगड, राधानगरी या तालुक्यात पायी चालत जात होते. (Kolhapur Prisoners Kalamba Jail)

सराईत गुन्हेगार जेलच्या कोव्हिड सेंटरचे गज कापून पळाले, ऊसाच्या शेतात दोन दिवस तळ, सापडले कसे?
कळंबा तुरुंगातून पसार झालेले गुन्हेगार
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 8:09 AM

कोल्हापूर : कळंबा जेलच्या कोव्हिड सेंटरमधून पळून गेलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत. दोघांनी दोन दिवस हातकणंगले तालुक्यात ऊसाच्या शेतात तळ ठोकला होता. मात्र परिसर सील करुन पोलिसांनी शिताफीने त्यांना पुन्हा जेरबंद केलं. कोल्हापूरमध्ये हा थरारक प्रकार घडला. (Kolhapur Prisoners ran away from Kalamba Jail COVID Centre)

प्रतीक सरनाईक आणि गुंडाजी नंदीवाले हे दोघे 14 मे रोजी रात्री कोव्हिड सेंटरचे गज कापून पळून गेले होते. पळून गेलेल्या दोघांना पकडण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा सीमाभागात नाकाबंदी करण्यात आली होती. हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना तातडीने पकडणे गरजेचे होते.

करवीर-कागल-राधानगरी पायी प्रवास

कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्यामुळे हे दोघे करवीर, कागल, भुदरगड, राधानगरी या तालुक्यात पायी चालत जात होते. गेल्या दोन दिवसांपासून या दोघा चोरट्यांनी हातकणंगले तालुक्यात ऊसाच्या शेतात तळ ठोकला होता. मंगळवारी सकाळी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी परिसराला सील केलं. त्यानंतर दोघांना पुन्हा एकदा पकडण्यात आलं. यावेळी पोलिसांनी कोरोनाबाबतची काळजी घेऊन कारवाई केली.

नागपुरातून पळालेला कैदी दिल्लीत

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या कच्च्या कैद्याला गेल्या वर्षी दिल्ली येथून अटक करण्यात आली होती. खटला सुरु असलेला आणि न्यायलयीन कोठडीत असलेला सिजो चंद्रन हा कैदी पळून गेला होता. सिजो चंद्रनला 16 मे रोजी शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या टीबी वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र संधीचा गैरफायदा घेऊन तो पळून गेला होता.

बहिणीला खोटं सांगून मुक्काम

आरोपी दिल्ली येथील बहिणीकडे गेला असल्याची माहिती पोलिसांना समजली होती, तेव्हा अजनी पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क करुन आरोपी सिजो चंद्रन संदर्भात सूचना दिली. तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याला त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली. कोरोनाचा धोका वाढला असल्याने महाराष्ट्र शासनाने हजारो कैद्यांची मुक्तता केली आहे, मला देखील सोडून दिल्याची माहिती आरोपीने आपल्या बहिणीला दिली होती.

संबंधित बातम्या :

येरवडा कारागृहातून पाच कैद्यांचे पलायन, तात्पुरत्या जेलच्या खिडकीचे गज कापून पसार

कोरोनामुळे मलाही सोडलंय, नागपूर जेलमधून पळून गेलेला कैदी दिल्लीत बहिणीच्या घरी सापडला

(Kolhapur Prisoners ran away from Kalamba Jail COVID Centre)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.