स्थिरस्थावर होत असलेल्या कोल्हापूरकरांना पुन्हा धाकधूक, पंचगंगेची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली

पंचगंगा नदीचे पाणी 22 फुटांवरुन वाहत आहे.  जिल्ह्यातील 12 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप आहे. मात्र धरणक्षेत्रात संततधार सुरूच आहे.

स्थिरस्थावर होत असलेल्या कोल्हापूरकरांना पुन्हा धाकधूक, पंचगंगेची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली
Follow us
| Updated on: Sep 04, 2019 | 10:43 AM

Kolhapur Rain कोल्हापूर : राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा मुसंडी मारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर धो धो पाऊस कोसळत आहे. पुरात बुडालेलं कोल्हापूर (Kolhapur Rain ) हळूहळू स्थिरस्थावर होत असताना, पुन्हा पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात तब्बल 3 फुटांची वाढ झाली आहे.

पंचगंगा नदीचे पाणी 22 फुटांवरुन वाहत आहे.  जिल्ह्यातील 12 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप आहे. मात्र धरणक्षेत्रात संततधार सुरूच आहे.

पंचगंगेची धोक्याची पातळी 43 फुटांवर आहे. मात्र गेल्या महिन्यात आलेल्या महापुराने पाणीपातळी 55 फुटांपेक्षा अधिक पातळीवरुन वाहात होती.

गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. विशेषतः  कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असणार्‍या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. धरणांतून प्रतिसेकंद 2828 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, पुन्हा भोगावती नदीची पाणी पातळी वाढायला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील चोवीस तास पावसाचा जोर कायम राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

कोल्हापूर-सांगली महापूर

गेल्या महिन्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता. दोन्ही जिल्ह्यातील अनेक तालुके जवळपास दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस पाण्याखाली होती. दोन्ही जिल्ह्यातील लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. शेकडो माणसं आणि हजारो जनावरांचा मृत्यू झाला. महापुरामुळे पुणे-बंगळुरु महामार्ग बंद झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवत होता.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.