नातींकडून प्रोत्साहन, इचलकरंजीचे आजोबा दहावी उत्तीर्ण, वयापेक्षा अधिक टक्के
कोल्हापूरमधील प्रभुदास बजरंग लोले दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. 500 पैकी 335 गुण म्हणजे 67 टक्के त्यांनी मिळवले.
इचलकरंजी : शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं, हा शब्दप्रयोग सार्थ ठरवणारे एकतरी उदाहरण दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी पाहायला मिळतं. इचलकरंजीतील साठीच्या आजोबांनीही नातींकडून प्रोत्साहन घेत दहावीची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण केली आणि हा समज सार्थ ठरवला. (Kolhapur Senior Citizen passed SSC Exam)
कोल्हापूरमधील प्रभुदास बजरंग लोले दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. 500 पैकी 335 गुण म्हणजे 67 टक्के त्यांनी मिळवले. मराठीत सर्वाधिक 70 गुण त्यांना प्राप्त झाले आहेत.
“आर्या आणि शौर्या या नातींनी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे कठीण मानली जाणारी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो” अशा भावना लोले यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा : SSC Results : दहावीचा राज्याचा निकाल 95.30%, यंदाही मुलींची बाजी
प्रतिकूल परिस्थितीमुळे प्रभुदास लोले यांना लहानपणी सातवीनंतर शिक्षण घेता आले नव्हते. पुढे व्यवसायात स्थिरस्थावर होण्याकडे आणि मुलांना उच्च शिक्षण देण्याकडे लक्ष दिल्याने ते शिक्षणापासून दूर होते.
अलिकडे कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांना दहावी उत्तीर्ण होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानुसार त्यांनी इचलकरंजीतील पंचशील हायस्कूल येथे प्रवेश घेतला. मुख्याध्यापक हेमंत धनवडे, बहिस्थ विद्यार्थी उपकेंद्र संचालक नरेंद्र कांबळे, कपिल धनवडे, आर. एन. कांबळे यांनी त्यांची तयारी करुन घेतली. (Kolhapur Senior Citizen passed SSC Exam)
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
शिकण्याची दुर्दम्य इच्छा असेल तर वयाची आडकाठी येत नाही, याचाच दाखला वयाच्या साठीतही दहावी उत्तीर्ण होऊन त्यांनी दिला आहे.
दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून पंधरा वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. कोकणाखालोखाल राज्यात कोल्हापूरचा निकाल सर्वाधिक (97.64 टक्के) लागला.
VIDEO : सुपरफास्ट 50 न्यूज | 30 July 2020 https://t.co/hLRc9rB3Ov
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2020
(Kolhapur Senior Citizen passed SSC Exam)