AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur By Election Result 2022 : कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधवांचा विजयाचा गुलाल, विजयाचे मानकरीही सांगितले

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले असून यात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

Kolhapur By Election Result 2022 : कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधवांचा विजयाचा गुलाल, विजयाचे मानकरीही सांगितले
विजयी उमेदवार जयश्री जाधव यांची प्रतिक्रिया Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 4:28 PM

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा मतदारसंघाच्या  पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले असून यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार जयश्री जाधव यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे कोल्हापुरात सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. या विजयानंतर जयश्री जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा विजयाचे श्रेय आपण कुणाला देणार असा प्रश्न विचारला. यावेळी महाविकास आघाडी सत्ता, बंटी साहेब (सतेज पाटील), हसन मुश्रीफजी आदीसह स्वाभिमानी जनतेला मी हे श्रेय देते, अशी भावना जयश्री जाधव यांनी व्यक्त केली.

विजयाचे मानकरी कोण? जयश्री म्हणतात…

अत्यंत अटीतटीच्या या लढतीय विजयी ठरलेल्या जयश्री जाधव यांनी विजयी प्रतिक्रिया नोंदवली. या यशाचे श्रेय कुणाला जाते या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘ महाविकास आघाडी सत्ता, बंटी साहेब, मुश्रीफ, मधुनिमा राजे, मालोजीराजे, पूर्ण अधिकारी, पदाधिकारी, सबंध स्वाभिमानी जनता, सगळे नगरसेवक यांना देते. त्यांच्यामुळेच हा विजय मिळाल्याचे त्या म्हणाल्या. आता विजयी झाल्यानंतर जनतेच्या सेवेत रूजू होणार असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

काँग्रेसचाच झेंडा हाती

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदार संघात ही पोटनिवडणूक लावण्यात आली होती. खरं तर ही निवडणूक होऊच नये, अशी विनंती करण्यात आली होती. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना आमदारकी मिळवण्याचे प्रयत्न झाले. मात्र भाजपने पोटनिवडणूक झालीच पाहिजे, असा आग्रह धरल्यानंतर येथे मतदान घेण्यात आले. यात तीन पक्षांच्या आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.

इतर बातम्या-

Kolhapur Election Result 2022 LIVE : कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, भाजपला मोठा झटका

Kolhapur North By Election 2022 : कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणी सुरू असतानाच एक ईव्हीएम मशीन बंद; व्हीपॅटची मोजणी सुरू

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.