आता सुट्टी नाही; धनंजय महाडिकांचा लेक विधानसभेच्या रिंगणात?; लढाईचा पहिला ट्रेलर आऊट

Krishnaraaj Mahadik Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात घडमोडींनी वेग घेतला आहे. कोल्हापुरात पुन्हा एकदा सतेज पाटील विरूद्ध महाडिक असा संघर्ष पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापुरात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

आता सुट्टी नाही; धनंजय महाडिकांचा लेक विधानसभेच्या रिंगणात?; लढाईचा पहिला ट्रेलर आऊट
कृष्णराज महाडिक
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 2:51 PM

कोल्हापुरातील राजकारण म्हटलं की महाडिक आणि पाटील कुटुंबातील संघर्षाशिवाय ते पूर्ण होत नाही. कोल्हापुरातील राजकारणात धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्याती राजकीय संघर्षाची चर्चा झाली नाही तर नवल… पण आता या संघर्षाचा नवा अंक सुरु होतोय. कारण महाडिक कुटुंबातील एक नवा सदस्य राजकारणात पाऊल टाकतोय. खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराज महाडिक राजकारणात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहेत. यूट्यूबर असणारे कृष्णराज महाडिक आता राजकीय कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहेत. तसे संकेत त्यांनी नव्या व्हीडिओच्या माध्यमातून दिले आहेत.

कृष्णराज महाडिक यांच्याकडून वातावरण निर्मितीचा प्रयत्न

राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. अशातच महाडिक कुटुंबातील नवा चेहरा लोकांसमोर येत आहे. कृष्णराज महाडिक विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीतून कृष्णराज महाडिक विधानसभेची निवडणूक लढू शकतात. कृष्णराज महाडिक यांनी एक व्हीडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. ‘आता सुट्टी नाही’ असं म्हणत कृष्णराज महाडिक यांनी नवा व्हीडिओ शेअर केलाय. यात कृष्णराज यांच्याबद्दल बोलताना काही लोकांनी ‘भावी आमदार’ असा उल्लेख केला आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची सद्यस्थिती काय?

कोल्हापूर उत्तरमध्ये सध्या काँग्रेसच्या जयश्री जाधव या आमदार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे राजशे क्षीरसागर उमेदवार असतील असं बोललं जात आहे. क्षीरसागर हे दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहे. त्यामुळे या जागेवर क्षीरसागर दावा करतील. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सतेज पाटील देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अशातच कृष्णराज महाडिक देखील या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध महाडिक असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

कोण आहेत कृष्णराज महाडिक?

कृष्णराज महाडिक हे यूट्यूबर आहेत. ‘Krish Mahadik’ असं त्यांच्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे. यावर ते अनेक व्हीडिओ शेअर करत असतात. त्यांच्या कौटुंबिक व्हीडिओंना नेटकरी पसंती देतात. शिवाय राजकारण आणि समाजकारणाबद्दलचे व्हीडिओ देखील कृष्णराज महाडिक त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करत असतात. या शिवाय कार रेसर अशीही त्यांची ओळख आहे. कोल्हापूरच्या सामाजिक राजकीय वर्तुळात कृष्णराज महाडिक अॅक्टिव्ह आहेत. तरूणांमध्ये त्यांची क्रेझ पाहायला मिळते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.