भांडूप का भामटा, बांद्रा का बंदर… कुणाल कामराच्या ‘त्या’ कवितेवर शिवसेनेचे चोख प्रत्युत्तर
कुणाल कामरांच्या विवादास्पद टिप्पणींना उत्तर म्हणून ज्योती वाघमारे यांनी एक कविता लिहिली आहे. या कवितेत त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. वाघमारे यांनी आपली कविता कुणाल कामराच्या शैलीत लिहिलेली आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केली. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराच्या वक्तव्याचा निषेध केला. आता शिवसेना शिंदे गटाच्या नेते डॉ. ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. ज्योती वाघमारे यांनी कुणाल कामराप्रमाणे कविता करत जबरदस्त टोला लगावला आहे.
ज्योती वाघमारे यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी एक कविता केली आहे. या कवितेद्वारे त्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. कुणाल कामराला त्याच्याच ईस्टाईल मध्ये उत्तर, असे ज्योती वाघमारेने म्हटले.
ज्योती वाघमारेने केलेली कविता
“भांडूप का भामटा, सुबह की प्रेस, माईक देखतेही भौके, हाय हाये बांद्रा का बंदर, हिंदूत्व को बेचकर, सीएम की कुर्सी को ललचाऐ इन कमीनो को मिठ्ठी मे मिलाने भगवा झेंडा फेहराऐ जनता की नजर से तुम देखो तो ठाणे का टायगर नजर आए चेहरे पे दाढी आखो मै शोले, तांडव करे जैसे शंभू भोले उनकी दहाड सुनकर ये चुहे बिल मै जाके छुप जाए जनता की नजर से तुम देखो तो ठाणे का टायगर नजर आए”
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
कुणाल कामराने मुंबईच्या खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कॉमेडी शो केला. या शोमध्ये एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत हिंदी गाण्यांचं रिमिक्स करून त्यानं गाणी म्हणून दाखवली. यावरून आता मोठा वाद सुरू झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या क्लबची तोडफोड केली. एकीकडे तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.