दारूच्या नशेत निर्दयी बापने काय केलं पाहा; या कृत्याने तळपायाची आग मस्तकात जाईल…

दारुच्या नशेत असलेल्या बाप जेव्हा घरी आला त्यावेळी त्याच्या भावाने त्याला विचारले की, मुलगी कुठे आहे. त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून मात्र आधी घराला बसला धक्का, नंतर सगळा परिसरच हादरून गेला.

दारूच्या नशेत निर्दयी बापने काय केलं पाहा; या कृत्याने तळपायाची आग मस्तकात जाईल...
दुकानाचे शटर तोडून मोबाईलची चोरी
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 10:11 PM

सांगली : दारूची नशा माणसाला कधी काय करण्यास भाग पाडले सांगता येत नाही. अशाच एका दारू नशेत असलेल्या बापाने केलेल्या कृत्यामुळे आता महाराष्ट्र हादरला आहे. ही घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात. दारुच्या नशेत असणाऱ्या बापाने आपल्या पोटच्या चार वर्षाच्या मुलीला विहिरीत टाकून तिली ठार मारले आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यासह परिसर हादरला आहे.

दारूच्या नशेत वाळवा तालुक्यातील कुरळप येथे निर्दयी बापानेच 4 वर्षाच्या मुलीचा विहिरीत टाकून जीव घेतला आहे. बापानेच पोटच्या लहान मुलीचा जीव घेतल्याने कुरळप गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसर हादरून गेला असून या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

आण्णाप्पा तुकाराम कोळी (सध्या रा कुरळप ता. वाळवा, जि. सांगली) असे निर्दयी बापाचे नाव आहे.कोळी यांचे कुटूंब कडक लक्ष्मीचा व्यवसाय करत असून ते मागील पंधरा वीस वर्षांपासून कुरळप येथील पाण्याच्या टाकीजवळील माळरानावर वास्तव्यास आहेत.

रात्री अण्णापा कोळीने दारूच्या नशेत आपल्या 4 वर्षाच्या पोटच्या मुलीला कुरळपमधील येलूर रोडवरील असणाऱ्या रस्त्याकडील मेतुगडे यांच्या विहिरीत रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ढकलून देऊन तो घरी गेला होता. तर त्याचा भाऊ राजेंद्र कोळी हा ऊस तोडून घरी आला होता. भावाची मुलगी घरात दिसली नसल्याने त्याला मुलगी कुठे आहे विचारण्यात आले.

त्यावेळी त्याने विहिरीत टाकल्याचे सांगितले. त्यानंतर अण्णाप्पाच्या भावाने याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर कुरळप पोलिसांनी निर्दयी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

या घटनेची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, सहाय्य्क पोलीस निरीक्षक दीपक जाधव,अनिल पाटील सह पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन रात्री 2 पर्यंत पाहणी केली होती. रात्रीच्या वेळी तपास करूनही मुलगी विहिरीत दिसून आली नाही.

त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज विद्युत मोटारी रात्रभर सुरु करून पाणी कमी करण्यात आले. त्यानंतर आज सकाळी 7वाजता मुलीचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसून आले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, अनिल पाटील, बापुसाहेब कांबळे यांनी मुलीचे काका राजेंद्र कोळी यांना विहिरीतून प्रेत बाहेर काढण्यास सांगितले.

प्रेत काढतानाचे दृश्य हे मन हेलावून टाकणारे होते तर राजेंद्र याला अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी मुलीच्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.