Lalit Patil | नदीपात्रात कोट्यावधी रुपयांचा ड्रग्सचा साठा…पोलिसांचे मध्यरात्री अंडर वॉटर सर्च ऑपरेशन

Lalit Patil | ललित पाटील ड्रग्स केसमध्ये मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ललित पाटील यांच्या टीमने नदीपात्रात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स फेकले होते. हे ड्रग्स शोधून काढण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्रीपासून ऑपरेशन सुरु केले.

Lalit Patil | नदीपात्रात कोट्यावधी रुपयांचा ड्रग्सचा साठा...पोलिसांचे मध्यरात्री अंडर वॉटर सर्च ऑपरेशन
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 7:39 AM

चंदन पुजाधिकारी, नाशिक | 24 ऑक्टोंबर 2023 : पुणे ससून हॉस्पिटलमधून ललित पाटील याचे ड्रग्स प्रकरण उघड झाले. त्यानंतर एकामागे एक धक्कादायक घटना घडत आहेत. रुग्णालयाच्या कैदेतून ललित पाटील याने फरार होणे, पंधरा दिवसानंतर तो पोलिसांना सापडणे, एकामागे एक १५ जणांना या प्रकरणात झालेली अटक, या प्रकरणात झालेल्या टीकेनंतर पोलिसांचा सुरु असलेला धडाकेबाज तपास…या सर्व प्रकरणानंतर सोमवारी मध्यरात्रीपासून मोठे ऑपरेशन मुंबई पोलिसांनी राबवले. ललित पाटील याच्या साथीदारांनी नदीपात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढण्यासाठी हे ऑपेरशन राबवण्यात आले. त्यात पोलिसांनी मोठे यश आले आहे.

काय मिळाले ऑपरेशनमधून

मुंबई पोलिसांनी सोमवारी ललित पाटील याची पोलीस कोठडी वाढवून मागितली. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली. त्यानंतर ललित पाटील याचा चालक सचिन वाघ हा ही मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने ड्रग्सचा मोठा साठा नदीपात्रात फेकल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले होते. हा ड्रग्ससाठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने ऑपरेशन राबवले. त्यानंतर कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिकमध्ये राबवले गेले ऑपरेशन

नाशिकमधून मुंबई पोलिसांच्या टीमने पुन्हा एकदा ड्रग्सचा मोठा साठा हस्तगत केला आहे. नाशिक सटाणा रस्त्यावरील लोहनेर ठेंगोडा गावातील गिरणा नदीपात्रातून कोट्यावधी रुपयांचा ड्रग्सचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा साठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तब्बल ३ ते ४ तास अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केले. रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरच्या मदतीने १५ फूट खोल नदीपात्रात रात्रीच्या अंधारात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.

कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स मिळाले

ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मुंबई पोलीस मध्यरात्रीच नाशिकच्या ग्रामीण भागात कारवाईसाठी पोहचले. ललित पाटील याचा चालक सचिन वाघ याने गिरणा नदीपात्रात फेकलेले कोट्यावधी रुपयांचे ड्रग्स जप्त केले. सचिन वाघ याने तब्बल दोन गोण्या भरून ड्रग्सचे पॅकेट नदीपात्रात फेकले होते. जप्त करण्यात आलेल्या ४० ते ५० किलो ड्रग्सच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १०० कोटींच्या घरात आहे. तसेच देवळाजवळच्या सरस्वतीवाडी भागातून देखील पोलिसांनी तब्बल १५ किलो ड्रग्स जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.